आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअगरतळा - त्रिपुरा विधानसभेसाठी भाजपच्या प्रचाराला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरुवात केली आहे. पहिल्याच प्रचारसभेत मोदींनी माणिक सरकार यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, 'येथे 25 वर्षे कम्यूनिस्टांनी राज्य केले. त्यांनी जनतेला फक्त धोका दिला. त्रिपुराने चुकीचा 'माणिक' घातलेला आहे. आता त्यांना हिरा (H-हायवे, I-आय वे, R-रोड वे, A-एअर वे) पाहिजे.' पंतप्रधान सोनामूरा येथील रॅलीत बोलत होते. सोनामूरा हा मुस्लिम बहुल भाग आहे. त्यासोबतच मुख्यमंत्री माणिक सरकार यांच्या मतदारसंघापासून जवळ आहे. माणिक सरकारही आज याच भागात प्रचार करत आहेत.
सोनमूरा येथे मोदी काय म्हणाले...
1) त्रिपुराच्या जनतेला 25 वर्षांपासून त्यांचा अधिकार मिळाला नाही
- पंतप्रधान म्हणाले, 'देशाच्या नागरिकांना जेवढे मिळते तेवढे तुम्हाला मिळत नाही. येथील सरकार तुम्हाला धोका देत आहे. 25 वर्षांपासून येथे कम्यूनिस्टांचे सरकार आहे, मात्र त्रिपुराच्या नागरिकांना त्यांचा अधिकार मिळालेला नाही.'
- कम्यूनिस्ट त्यांच्या पद्धतीने लोकशाहीचा वापर करत आहेत. राज्य सरकारने भयाचे वातावरण निर्माण केले आहे. येथील कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाचा फायदा मिळाला पाहिजे. भाजपचे सरकार आले तर ते लागू केले जाईल.
2) काँग्रेस-कम्यूनिस्ट बळाच्या जोरावर सरकार चालवतात
- राज्यात कोणाची हत्या झाली तर सर्वात आधी लाल सलाम वाल्यांच्या दारात जावे लागते. तेव्हा एफआयआर दाखल होतो. काँग्रेस आणि कम्यूनिस्ट बळाच्या जोरावर सरकार चालवत आहेत.
- आमचे सरकार रेल्वे, चांगले रस्ते आणि लोकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करते. जोपर्यंत देशाच्या पूर्वेच्या भागातील राज्यांमधून हे सरकार हँटणार नाही तोपर्यंत विकास होणार नाही. त्रिपूराच्या विकासाशिवाय देशाचा विकास संभव नाही.
3) त्रिपुराच्या टी (चहा) सोबत तीन T परिस्थिती बदलणार
- त्रिपुराने चुकीचा माणिक घातलेला आहे. हे रत्न चुकीचे आहे. त्यामुळे त्रिपुराची स्थिती अशी झाली आहे. दिल्लीत किती सरकार बदलले तरी त्रिपुराचा विकास होत नाही, कारण येथे असा दगड बसलेला आहे की तुमचे अच्छे दिन येऊ देत नाही. त्रिपुराला हिरा (H-हायवे, I-आय वे, R-रोड वे, A-एअर वे) पाहिजे. जो विकासाचा मार्ग दाखवेल.
- त्रिपुराच्या टी (चहा) सोबत तीन T (ट्रेन, टुरिझम आणि ट्रेनिंग) जोडले तर त्रिपुराची स्थिती बदलेल.
- आम्ही रेल्वे मार्गाने त्रिपुराला दिल्लीशी जोडले आहे. आता दिल्ली दूर नाही. 1700 कोटी रुपये खर्च करुन 125 किलोमीटरचा मार्गसुरु केला आहे. अगरतळामध्ये विमानतळ तयार करण्यासाठी 450 कोटी रुपये मंजूर केले आहेत.
4) आम्हाला प्रत्येक राज्याची चिंता
- टेलिफोन कनेक्टिव्हिटी गेल्यानंतर सर्वकाही बंद झाल्यासारखे वाटते. आम्ही अगरतळा येथे इंटरनेट गेटवे सुरु केला आहे. शेजारी देशांकडून इंटरनेट घेणारे त्रिपुरा हे तिसरे राज्य झाले आहे. याआधी मुंबई आणि चेन्नई येथे ही सुविधा दिली होती. आम्ही सर्व राज्यांचा सारखा विचार करतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.