आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Love Story पहिल्या भेटीतच प्रेमात पडल्या होत्या गायत्री देवी, वाचा त्यांच्या आठवणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूरच्या महाराणी गायत्री देवी यांचा आज जन्मदिन आहे. या निमित्ताने divyamarathi.com त्यांच्या प्रेमकथेबद्दल सांगत आहे. त्यांचे लग्न जयपूरचे महाराज सवाई मानसिंह यांच्याबरोबर झाले होते. या दोघांची लव्ह स्टोरीही अत्यंत रंजक आहे. चला जाणून घेऊयात ही लव्ह स्टोरी. 

 

दिवंगत महाराणी गायत्री देवींच्या बायोग्राफीतून..

'अ प्रिंसेस रिमेम्बर्स' या पुस्तकातील हा संपादित भाग आहे. यात सवाई मानसिंह द्वितीय यांना त्यांची पत्नी गायत्रीदेवी जय संबोधतात. हे पुस्तक त्यांच्या पहिल्या भेटी संदर्भातील आणि त्यानंतर त्यांचे नाते घट्ट होण्याचा उलगडा करुन देते.

 

ही गोष्ट 1931 ची आहे. जय कोलकात्यात पोलो सीजन सुरु असल्या कारणाने आमच्यासोबत राहात होते. हिरव्या रंगाच्या रोल्स रॉइसमधून ते आले होते. तेव्हा त्यांचे वय साधारण 21 आणि माझे 12 वर्षे असेल. लहानपणी मी त्यांना महाराजा ऑफ जयपूर आणि युवर हायनेस असे संबोधत होते.

 

मी तेव्हा इंग्लंडमधील वुलिच मिलिटरी अॅकॅडमीमधून ट्रेनिंग पूर्ण करुन आले होते. कोलकत्याहून परतल्यानंतर त्यांनी जयपूर पोलो टीम तयार केली होती. तेव्हा मी माझ्या उरी एक स्वप्न बाळगले होते. परीकथांपेक्षा ते अगदी उलट होते. मी विचार करत असायचे की अशी काही जादू व्हावी आणि मी राजकुमाराच्या घोड्याची देखभाल करणारी झाली पाहिजे. जेणे करुन मी माझ्या हाताने छडी त्यांच्या हातात देऊ शकेल आणि त्यानिमीत्ताने त्यांच्या हाताला मला स्पर्ष करता येईल.

 

पुढील स्लाइडमध्ये वाचा, प्रपोज करताना काय म्हणाले होते महाराज मानसिंह..

 

 

बातम्या आणखी आहेत...