आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावाराणसी - 13 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री आहे. भोलेबाबाची नगरी काशीमध्ये महादेवाच्या मेहुण्याचे एकमेव मंदिर आहे. DivyaMarathi.Com या मंदिराचा इतिहास आणि याची खासियत याबाबत माहिती देत आहे...
अशी आहे मंदिराची कहाणी...
- खूप कमी लोकांना माहिती असेल की, महादेवाच्या मेहुण्याचे मंदिर सारनाथमध्ये आहे.
- पुजारी विनय दुबे म्हणाले, महादेवांचा विवाह दक्ष राजाची मुलगी सतीशी झाला होता. सतीचे मोठे भाऊ ऋषि सारंग लग्नाच्या वेळी हजर नव्हते. नंतर ते जेव्हा परतले तेव्हा हे ऐकून नाराज झाले की, एक वस्त्र, आभूषणे नसलेला, अडभंगी त्यांचा भावजी बनला आहे.
- काही दिवसांनी ऋषी सारंग दागदागिने घेऊन महादेवांना देण्यासाठी काशीत पोहोचले आणि सारनाथमध्ये येऊन थांबले. रात्री स्वप्नात त्यांना पूर्ण काशीनगरी सोन्याची दिसली, सकाळी डोळे उघडल्यावरही तेच दृश्य दिसले.
- हे पाहून त्यांना खूप पश्चात्ताप झाला आणि ते सारनाथमध्येच तपस्येवर बसले. हजारो वर्षांनंतर महादेवांनी प्रकट होऊन त्यांना 3 वरदान दिले.
- सारंग ऋषींनी महादेवांना प्रार्थना केली की, मलाही तुमच्यासोबत काशीमध्ये प्रार्थना करू द्यावी. महादेवांच्या या वरदानातून 2 स्वयंभू शिवलिंग निघाले, ज्यांचे सारंगदेव नावाने पूजन केले जाते. सारंगनाथ (मेहुणे) यांचे शिवलिंग मोठे आहे आणि सोमनाथ (भावजी) यांचे शिवलिंग आकारात आणखी उंच आहे.
- मंदिराशी निगडित आणखी एक आख्यायिका आहे. कालांतराने 2400 वर्षांपूर्वी जेव्हा बौद्ध धर्माचा प्रचार-प्रसार वेगाने होत होता.
- त्या वेळी प्रथम आदिशंकराचार्यांनी येथे येऊन बौद्ध धर्मगुरूंशी शास्त्रार्थ केला आणि त्यांचा वादविवादात पराभव करून याच स्थानावर सारंगदेवाजवळ एक शिवलिंग स्थापित केले, त्याला सोमनाथ म्हटले जाते.
मंदिराशी संबंधित इतर मान्यता...
- विवाहानंतर लगेच येथे दर्शन केल्याने सासर आणि माहेरचे संबंध चांगले राहतात.
- भावजी आणि मेहुण्यादरम्यान महादेव आणि सारंगनाथ यांच्याप्रमाणे मधुर संबंध बनतात.
- त्वचा रोग, चेहऱ्यावरील डाग, कुष्ठ, मस, वांग यासारखे आजार येथे दर्शनाने ठीक होतात.
- 41 सोमवार लगातार दर्शन घेतल्याने स्वर्ण संबंधित इक्षा पूर्ण होते.
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या अद्भुत मंदिराचे आणखी फोटोज...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.