आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

33 वर्षीय रुग्णाच्या पेशी नष्ट करतील त्याच्या कॅन्सरच्या पेशी; एमवायएचमध्ये रचला जाईल इतिहास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर- कॅन्सर म्हणजे श्वासागणिक वाढणारे भयानक दुखणे. रुग्णांची या जीवघेण्या दुखण्यांपासून सुटका करण्यासाठी मध्य प्रदेशातील एमवायएच या  सर्वात मोठ्या सरकारी रुग्णालयात सुविधा उपलब्ध होत आहे. या उपाययोजनेद्वारे फेब्रुवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून राज्यात बोनमॅरोपद्धतीच्या कॅन्सरच्या रुग्णांवर उपचार सुरू होत आहेत. रुग्णालय प्रशासनाने सुरुवातीच्या टप्प्यात कर्करोग पीडित (मल्टिपल मायलोमा) चार रुग्णांची निवड केली आहे. यामुळे एमवायएच ६ खाटांचे बोनमॅरो सेंटरची सुविधा असलेले देशातील पहिले रुग्णालय ठरणार आहे.  
 
या चार रुग्णांमध्ये सर्वप्रथम जुन्या इंदूरमधील ३३ वर्षीय उपेंद्रवर उपचार होणार आहेत. त्यास सहा वर्षांपूर्वी या आजाराचे निदान झाले. डॉक्टर त्याचे ऑटोलागेस बोनमॅरो प्रत्यारोपण करणार आहेत. या पद्धतीत रुग्णाच्या चांगल्या पेशी प्रत्यारोपित करून त्याच्यातील कॅन्सरग्रस्त पेशी नष्ट करतील. उपेंद्र यांनी सांगितले, मला आजार झाला, तेव्हा शरीराच्या वरच्या भागात हालचाल बंद झाली होती. वरचा भाग जड झाला होता.  त्यानंतर खालच्या भागात त्रास सुरू झाला. पत्नी व दोन मुलांसाठी बसल्या बसल्या काही काम करतो. शरीरात रक्त तयार होण्याची प्रक्रिया थांबली. डॉक्टरांनी म्हटले, बोनमॅरो प्रत्यारोपणानंतर किमोथेरपीसारख्या त्रासदायक प्रक्रिया करावी लागणार नाही. वेळीच उपचार न झाल्यास ब्लड कॅन्सर होण्याची शक्यता आहे. 
 
कर्करोगाचा रुग्ण बरा होण्याची ७०% शक्यता  
एमजीएम वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. शरद थोरा यांनी सांगितले, ऑटोलोगस प्रत्यारोपणात दात्यांची गरज पडणार नाही. रुग्णाच्या शरीरातील चांगल्या पेशी काढून प्रत्यारोपित करण्यात येतील.  हे यशस्वी होण्याचे प्रमाण ७० टक्के इतके आहे. ३०% प्रकरणात ८ किंवा ९ वर्षांनंतर आजार उद््भवू शकतो. पहिला रुग्ण प्रत्यारोपणासाठी तयार आहे. त्याच्या रक्ताच्या सर्व तपासण्या, सीटी स्कॅन, एमआरआय झालेले आहे. पोटाचे स्कॅन होणे आहे.    
 
मल्टिपल मायलोमा  
मल्टिपल मायलोमा पांढऱ्या रक्तपेशी आजारी पडून बोन मॅरोमध्ये एकत्र जमा होतात. यातून प्रथिने विषारी बनतात. हळूहळू किडनीसह अन्य अवयवावर याचा परिणाम होतो. हाडे दुखण्याचा त्रास सुरू होतो. हाडे पातळ व जाळीदार होतात.  
 
असे बरे करतात  
ऑटोलोगस बोनमॅरो प्रत्यारोपणात रोगग्रस्त बोन मॅरो बदलतात. खराब पेशी नष्ट करण्यासाठी अाधी किमोथेरपी केली जाते. त्यानंतर चांगल्या पेशी प्रत्यारोपित करतात. प्रत्यारोपित पेशी अन्य पेशी तयार करतात.
 
- ४० % प्रकरणात वेळेवर निदान झाले तर कॅन्सरपासून वाचू शकता  
- ०१ तृतीयांश कॅन्सर वेळेवर तपासणी व योग्य उपचाराद्वारे दुरुस्त करता येतो. 
- ०१ काेटी ४१ लाख नव्या कॅन्सरची प्रकरणे उपचारात दरवर्षी जगभरात उजेडात येतात  
- ७० टक्के वाढ येत्या दोन दशकात दरवर्षी कॅन्सरची उघडकीस येतात.  
- १७.३ लाख कॅन्सरचे नवे रुग्ण २०२० पर्यंत समोर येतील.  
बातम्या आणखी आहेत...