आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महात्मा गांधी हत्या : न्यूयॉर्कहून आणलेली कागदपत्रे थेट घेण्यास नकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- महात्मा गांधी हत्या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकाकर्त्याने सोमवारी न्यूयॉर्क येथून आणलेली काही प्रतिबंधित कागदपत्रे सर्वोच्च न्यायालयात सादर केली. सीलबंद लिफाफ्यात सादर केलेली कागदपत्रे पुरावे म्हणून थेट स्वीकारण्यास न्यायालयाने नकार दिला. न्यायालयाने त्यासाठी नवा अर्ज दाखल करण्यास सांगितले आहे. 


याचिकाकर्ता पंकज फडणीस यांनी सोमवारी न्यायमूर्ती एस. ए. बोबडे आणि एल. एन. राव यांच्या खंडपीठाला एक सीलबंद लिफाफा दाखवला आणि त्यात महात्मा गांधी हत्या प्रकरणाशी संबंधित महत्त्वाची आणि गोपनीय माहिती आहे, असे सांगितले. ते म्हणाले की, न्यूयॉर्क येथील अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहातील वाचनालयातून ही कागदपत्रे मिळाली आहेत. भारतात बंदी घातली असल्याने ती सीलबंद लिफाफ्यात सादर केली आहेत.  त्यावर न्यायमूर्ती बोबडे म्हणाले की, ही कागदपत्रे महत्त्वाची का आहेत हे नवा अर्ज दाखल करून न्यायालयाला सांगावे. त्यानंतर एवढे जुने प्रकरण पुन्हा उघडण्याची गरज आहे की नाही याबाबत विचार करण्यात येईल.

बातम्या आणखी आहेत...