आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दगडफेक करणाऱ्याला जीपला बांधणाऱ्या गोगोईंना अल्पवयीन मुलीबरोबर हॉटेलमध्ये अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू-दगडफेक करणाऱ्याला जीपला बांधून त्याची वरात काढणारे लष्कराचे अधिकारी मेजर गोगोई यांनी पोलिसांनी गंभीर आरोपांखाली अटक केली आहे. गोगोई एका हॉटेलमध्ये एका मुलीबरोबर रात्र घालवणार होते, पण त्याआधी त्यांना अटक करण्यात आली. जम्मू पोलिसांनी सांगितले की, हॉटेलमधून कॉल आल्यानंतर पोलिस त्याठिकाणी पोहोचले आणि त्यांना लष्करी अधिकाऱ्यांसह एक अल्पवयीन मुलगी आणि ड्रायव्हरला ताब्यात घेतले. 


हॉटेलची रूम आसामहून गोगोई यांच्या नावावर बूक करण्यात आली होती. ही बुकींग ऑनलाइन करण्यात आली होती. गोगोई 24 मे रोजी चेकआऊट करणार होते. पण पोलिस 23 मे रोजी रात्री पोहोचले आणि गोगोईसह सर्वांना ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणले. ही मुलगी लष्करी अधिकाऱ्याला भेटण्यासाठी आली होती, असे चौकशीत सांगण्यात आले आहे. 


हॉटेलच्या मालकाने दिलेल्या माहितीनुसार, गोगोई यांनी हॉटेल बूक केले होते. रजिस्ट्रेशन फॉर्मवर त्यांनी दोन लोकांची नावे लिहिली होती. हॉटेल मॅनेजमेंटने त्यांना आधार कार्ड मागितले, त्यात एक स्थानिक काश्मिरी मुलीचे होते आणि ती अल्पवयीन होती. या प्रकरणानंतर मेजर आणि तरुणीची चौकशी सुरू आहे. तर संपूर्ण प्रकरणाची देखिल पोलिस अधीक्षकांमार्फत चौकशी होणार आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...