आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहाथरस- हुंड्यात बाइक न मिळाल्याने पतीने पत्नीवर डिझेल टाकून पेटवून दिल्याची घटना येथे घडली आहे. माहिती मिळताच आस-पासचे लोक घटनास्तळी पोहोचले आणि आग विझवली. महिलेला गंभीर अवस्थेत उपचारासाठी रुग्नालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या पीडितेची अवस्था चांगली असल्याचे सांगण्यात येत आहे.
असे आहे संपूर्ण प्रकरण...
- मिळालेल्या माहितीनुसार, मैनपूरी जिल्ह्यातील रहिवाशी परवीन प्रदीप चे जूलै 2016 मध्ये हथरस जिल्ह्यातील पूरा खुद गावातली सतीशशी लग्न झाले होते.
- पीडित महिलेच्या वडिलांनुसार, त्यांना आपल्याला शक्य देवढा हुंडा लग्नात दिला होता. लग्नाच्या काही दिवसानंतर परवीनचा पती सतीश हुंड्यात बाइकची मागणी करू लागला. यासाठी तो तिला रोज टॉर्चर करू लागला. मारहाण देखील करू लागला. पत्नीवर दबाव टकात होता, की माहेरून बाइकसाठी पैसे घेऊन ये.
- यामुलेच गुरूवारी सतीशने आपल्या पत्नीवर डीझल टाकून तिला पेटवून दिले. परंतु, आस-पासच्या लोकांनी तात्काळ पोहोचून आग विझवली आणि परवीनचे प्राण वाचवले.
- माहिती मिळताच त्यांना 100 नंबर डायल करून पोलिसांना फोन केला. पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि परवीनला पोलिस ठाण्यात घेऊन गेले, तेथून तिला उपचारासाठी जिल्हा रुग्नालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सांगितले की, आता महिलेची अवस्था ठिक आहे.
पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.