आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजस्थानात ‘मणप्पुरम’वर दरोडा; 25 किलो सोने लंपास,दरोडेखोरांनी कार्यालयास कुलूप ठोकले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोटा- राजस्थानातील कोटा येथील नयापुरा पोलिस ठाण्यापासून काही पावलांच्या अंतरावर असलेल्या मणप्पुरम गोल्ड लोन फायनान्स कंपनीत सोमवारी दुपारी १ वाजता दरोडा पडला. चार बंदूकधारी दरोडेखोर कंपनीच्या कार्यालयात घुसले. त्यांनी अवघ्या ४५ मिनिटांत २५ किलो सोने लुटून नेले. या सोन्याची बाजारात ७.५० कोटी रुपये इतकी किंमत आहे. या दरोडेखोरांनी जाता जाता कार्यालयास बाहेरून कडी लावली.  


कोटा रेंजचे पोलिस महानिरीक्षक विशाल बन्सल यांनी सांगितले, मणप्पुरम गोल्ड लोन फायनान्स कंपनीच्या शाखेत लोकांना सोने गहाण ठेवून कर्जाऊ रक्कम दिली जाते. ही घटना दुपारी एक वाजताची आहे. दरोडा पडत असताना कार्यालयात काही कर्मचारी व ग्राहक उपस्थित होतेे. कार्यालयात आलेल्या बंदूकधारी गंुडांनी लोकांना बंदुकीचा धाक दाखवला. त्यांच्या हातातील बंदुका पाहून सर्व घाबरले होते. त्यांच्या तोंडून शब्दही फुटत नव्हता. दरोडेखाेरांनी मणप्पुरमच्या व्यवस्थापकास मारहाण सुरू केली. लॉकरचे कुलूप तोडून त्यातील सुमारे २५ किलो सोने लुटून नेले. त्यांनी इतरांवर हल्ला केला नाही.  

 

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसले दरोडेखोर  
दरोडेखोर दरोड्याच्या वेळी आणि परत जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसतात. पोलिस महानिरीक्षक विशाल बन्सल यांनी सांगितले, या सीसीटीव्हीच्या फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेणे सुरू  आहे. सर्व मार्गांवर नाकेबंदी करण्यात आली आहे. आरोपींना लवकरच पकडण्यात येईल. कार्यालयात दहा कोटी रुपयांचे सोने ठेवण्यात आले होते. कार्यालयात सुरक्षा रक्षक नव्हता. तसेच कोणी धोक्याची घंटाही वाजवली नाही. दरोडेखोरांनी सर्वांचे मोबाइल हिसकावून घेतले होते, असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. सर्वांना एका खोलीत बंद करण्यात आले. कंपनीच्या व्यवस्थापकास मारहाण केली आणि लॉकर तोडून त्यातील साडेसात कोटी रुपयांचे सोने लुटून नेले.

बातम्या आणखी आहेत...