आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहराजगंज- पूरंदपूर- परिसरात शिसवनिया गावातील पंचायतीने अजब फरमान सुनावले आहे. गावातील एका जोडप्याला रात्री बोलताना पाहिल्यानंतर गावकरी भडकले, त्यानंतर गावात पंचायत बोलवण्यात आली आणि दोघांचे लग्न लावून देण्यात यावे असे फरमान ग्रामपंचायतीने सुनावले.
असे आहे संपूर्ण प्रकरण...
ही घटना 11 जानेवारीची आहे. रात्री उशीरा एक तरूणी गावातीलच एका तरूणाला भेटण्यासाठी पोहोचली. गावातील काही लोकांनी त्यांना बोलताना पकडले. त्यानंतर गावात पंचायत बोलवण्यात आली आणि पंचायतीत दोघांचे लग्न लावून देण्याचा निर्णय घेण्यात आला.
- अंधार असल्याने गाडीचे हेडलाईट लावण्यात आले. यानंतर तरूणाने तरूणीच्या भांगेत सिधूर भरला. या दरम्यान तेथे उपस्थित काही लोकांनी या घटनेचा व्हिडिओ शुट केला. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. काही लोक हे जोडपे अल्पवयीन असल्याचे सांगत आहेत.
- गावातील लोकांनी सांगितले की, दोघे एकमेकांवर प्रेम करत होते. तरूणीचे लग्न दुसरीकडे ठरले होते. तरी दोघांचे एकमेकांसोबत लग्न लावून देण्यात आले.
- डेपूटी एसपी मुकेश सिंह यांनी सांगितले की, व्हायरल व्हिडिओ समोर आला आहे. या प्रकरणी पोलिस तापस करत आहेत.
पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटो...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.