आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहितेने BF ला घरी बोलावले, Viagra म्हणून दिले भूलचे औषध; लिंग कापला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लुधियाणा - पंजाबमध्ये एका विवाहित तरुणीच्या अनैतिक संबंधातून अमानुष प्रकार घडल्याचे समोर आले आहे. येथे राहणाऱ्या एका विवाहितेने आपल्या मित्रांसोबत मिळून अविवाहित प्रियकराचा चक्क प्रायव्हेट पार्ट कापला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यानंतर ती आपल्या मित्रांसोबत घटनास्थळावरून पसार झाली. पीडित युवकाच्या कुटुंबियांना यासंदर्भातील माहिती मिळताच ते घटनास्थळी   दाखल झाले. त्यावेळी त्यांचा मुलगा बेशुद्ध अवस्थेत सापडला. त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पोलिसांनी कंगनवाल येथे राहणारी पम्मी वर्मा आणि तिच्या 5 सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. 


लग्नासाठी दबाव टाकत होती आरोपी विवाहिता...
- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित युवक एका खासगी कंपनीत नोकरी करतो. काही वर्षांपूर्वी आरोपी पम्मी आणि तो बिहारमध्ये राहत होते. दोघे शेजारीच असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्यात प्रेम संबंध होते. 
- काही कारणास्तव दोघांचे लग्न होऊ शकले नाही. तसेच पम्मीच्या कुटुंबियांनी तिचे लग्न लुधियाणातील दुसऱ्याच एका व्यक्तीसोबत केला. तेव्हापासूनच ती लुधियाणात राहत होती. यानंतर दोघांचे अफेअर सुरूच होते.
- पीडित युवकाने आपल्या विवाहित प्रेयसीचा पत्ता शोधून काढला आणि तिच्या पतीच्या शेजारीच राहायला आला. पम्मीने नर्सिंगचा डिप्लोमा केला होता. त्यामुळे, ती एका रुग्णालयात नोकरी करत होती. 
- पीडित युवकाने सांगितल्याप्रमाणे, पम्मी गेल्या काही दिवसांपासून त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होती. हे दोघे दररोज भेटायचे आणि प्रत्येकवेळा ती लग्नाची मागणी करत होती. पण, विवाहित प्रेयसीसोबत लग्न करण्यास युवकाने नकार दिला. 


शक्तीवर्धक औषधीच्या नावाने भूल...
- त्यानंतर गुरुवारी पम्मीने घरात कुणीच नसल्याचे सांगत आपल्या प्रियकराला घरी बोलावले. तसेच शक्तीवर्धक औषध म्हणून भूलचे औषध दिले. युवक बेशुद्ध झाल्याचे पाहता तिने आपल्या 5 सहकाऱ्यांसोबत मिळून त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला. तसेच त्याला तशा अवस्थेत सोडून घटनास्थळावरून पसार झाली. 
- पोलिसांनी पम्मी आणि तिच्या मित्रांवर भा.द.वि. कलम 326, 328, 342 अंतर्गत गुन्हा दाखल केला. तसेच त्या सर्वांचा कसून शोध घेतला जात आहे. तर दुसरीकडे, पीडित युवकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

बातम्या आणखी आहेत...