आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मला माहित नाही ते किती टॉर्चर करतील...सासरच्यांनी पार केली अत्याचाराची हद्द

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाहजहांपूर- येथील एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. मुलीला जन्म दिल्याने सासच्यांनी महिलेची मारहाण करून हत्या केली असा असा आरोप करण्यात येत आहे. पोलिसांना एक सुसाइड नोट देखील मिळाली आहे, या पीडितेने आपले दुख्य व्यक्त केले आहे. मृत महिलेचे 22 महिन्यांपूर्वी लग्न झाले होते.


वडिलांनी केला असा आरोप...
- प्रकरण उत्तर प्रदेशच्या शहाजहांपूर जिल्ह्यातील सदर बाजार येथील आहे. येथे राहणाऱ्या 23 वर्षीय मितालीचा शुक्रवारी संशयास्पद स्थितित मृथ्यू झाला.
- फिरोजाबादचे राहणारे मृत महिलेचे वडिल पृथ्वीनाथ यांनी सांगितले की, 22 महिन्यांपूर्वी 26 एप्रिल 2016 ला मुलीचे शाहजहांपूर येथील बहादुरगंज मध्ये लग्न लावून देण्यात आले होते.
- तिचा पति BOB बँकेत व्यवस्थापक आहे. लग्नात 15 लाखांची कार आणि 250 ग्राम सोने हुंड्यात दिले होते. लग्नात जवळपास 40 लाख रुपये खर्च आला होता. मिताली माझी एकुलती एक मुलगी होती, त्यामुळे लग्नात तिला छोट्या वस्तूंपासून ते मोठ्या वस्तूनपर्यंत सर्व साहित्य दिले होते.
- लग्नाच्या काही दिवसानंतर सासरच्यांनी डस्टर कारची मागणी केली, यासाठी त्यांनी मुलीला मारहाण देखील केली. या दरम्यान ती प्रेग्नंट झाली. सासरच्यांनी तिचे अल्ट्रासाउंड केले तेव्हा कळाले की, तिच्या गर्भात मुलगी आहे.
- माहिती मिळताच त्यांनी मितालीवर मुलीला जन्म न देण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली, यासाठी त्यांनी तिला मारहाण देखील केली. त्यानंतर मी मुलीला आपल्या घरी घेऊन आलो आणि तिची डिलीवरी येथेच झाली.
- 5 महिन्यांपूर्वी पंचायत भरली आणि सुलाह करून ते मुलीला परत सासरी घेऊन गेले. तेथे तिचा फोन देखील हिसकावून घेण्यात आला. जेव्हा केव्हा फोन केला, तेव्हा तिचा पतीच फोन उचलत होता.
- शुक्रवारी मुलीच्या सासरच्या शेजारी साहणाऱ्या व्यक्तीचा फोन आला की, मितालीचा मृत्यू झाला आहे. जाऊन पाहिले तर मुलीचा मृतदेह बेडवर पडलेला होता. तिच्या संपूर्ण शरिरावर मारहाण करण्यात आल्याचे निशान होते.
- मितालीचे वडिल म्हणाले की, मला पूर्ण खात्री आहे की, सासरच्यांनी तिला निर्दयीपणे मारहाण केली, यामुळे तिचा मृत्यू झाला.


नोटमध्ये महिलेने लिहिले होते असे...
लग्नाच्या दोन महिन्यानंतर पती आणि सासरच्यांनी मला मेंटली आणि फिजिकली टॉर्चर करण्यास सुरूवात केली होती. प्रेग्नंसीमध्येदेखील त्यांनी टॉर्चर करणे बंद केले नाही. जेवण देत नव्हते, खोलीत बंद करून ठेवत होते. जेव्हा त्यांना काळाले की, माझ्या गर्भात मुलगी आहे, तेव्हा त्यांनी तिला गर्भातच मारण्याचा प्रयत्न केला. माझा दिर डॉक्टर आहे, एक दिवस तो माझ्या खोलीत आला आणि त्याने मला एक इंजेक्शन देण्याचा प्रयत्न केला. कसेतरी करून मी त्याला थांबवले. त्यानंतर पतीने मला खूप मारहाण केली आणि घरातून काढून दिले. माहेरी राहून मी मुलीला जन्म दिला. परंतु, माझ्या वडिलांना वाटत होते, की माझ्या मुलाला त्याच्या आज्जी-आजोबांचे प्रेम मिळावे त्यामुळे ते मला माहेरी पाठवत आहेत.

 

पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्....

बातम्या आणखी आहेत...