आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यूपूर्वी लिहिले- जिवंत राहिले तर अनेक जण होतील पागल, 6 दिवसांपूर्वीच झाले होते लग्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पूजाने दोन दिवसांपूर्वी रीटची परिक्षा दिली होती. - Divya Marathi
पूजाने दोन दिवसांपूर्वी रीटची परिक्षा दिली होती.

चिडावा (सीकर)- सुलताना जाटावास कॉलनीत माहेरी आलेल्या नव्या नवरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पूजा जांगिड असे या नवरीचे नाव आहे. सहा दिवसांपूर्वी तिचा विवाह वाहिदपूरा येथील झुंझुनूच्या पंकज जांगिडसोबत झाला होता. घटास्तळाहून पोलिसांनी एक सुसाइड नोट जप्त केली आहे. या दोन ओळीच्या नोटमध्ये कुटुंबाला उदेशून पूजाने म्हटले होते की, मी एक पागल मुलगी आहे, जर जिवंत राहिले तर खुप लोक पागल होतील, सॉरी मम्मी-पप्पा आय क्वीट. 


दोन दिवसांपूर्वी दिली होती रिट परिक्षा...
- पूजाने दोन दिवसांपूर्वी रीटची परिक्षा दिली होती. रविवारी पेपर देण्यासाठी ती सासहून आपल्या पतीसोबत आली होती. परिक्षेनंतर भाऊ तिला सुलताना येथे घेऊन गेला. सायन्समधून ग्रॅजूएशन केलेल्या पूजाने बीएडचे शिक्षण घेतले होते.
- घटनेची माहिती मिळताच पूजाचा पति, सासरा आणि सासरचे इतर लोक सुलाताना येथे पोहोचले. माहिती मिळात घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी पंचानामा करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. त्यानंतर तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
- सुरूवातीच्या तपासात आत्महत्येमागील कारण पूजाच्या इच्छेविरूद्ध लग्न असल्याचे मानले जात आहे. तिचा भाऊ संदीपच्या रिपोर्टवरून पोलिसांनी केस दाखल केली आहे. 


सोमवारीच वडिला दुबईला परतले होते...
- सात फेब्रुवारीला एकुलती एक मुलगी पूजाचे लग्न लावून दिल्यानंतर किशोरी लाला जांगिज सोमवारी सकाळी दुबईला जाण्यासाठी सुलतानाहून दिल्लीला गेले होते. तेथून त्यांनी रात्री 12 वाजता दुबईसाठी विमान पकडले होते. नेव्हीमध्ये कार्यरत असलेला मोठा भाऊ संदीप मंगळवारी ड्यूटी ज्वाइन करण्यासाठी विशाखापट्टनमला जाणार होता.
- सोमावारी रात्री सुलातानामध्ये आपल्या कॉलणीतील एका कार्याक्रमात आलेल्या दोन मैत्रीणींसोबत पूजाने खुप गप्पा मारल्या होता. कार्याक्रमात पूजाना चागले एंजॉय केले होते. त्यानंतर रात्री साडे 11 वाजेच्या सुमारास ती घरी परतली.
- त्यानंतर घरातील सर्व सदस्य आपापल्या खोलीत झोपण्यासाठी निघून गेले. पुजा आपल्या वृद्ध आजी आणि लहान भाचीसोबत खोली बंद करून झोपली. रात्री उठून तिने आपल्या ओठणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हे सकाली कुटुंबीय उठल्यानंतर त्यांना समजले.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...