आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघातात कापलेल्या पायाला उशी बनवले; मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांसह 4 जण निलंबित

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

झांसी - उत्तर प्रदेशातील लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टरांनी केलेला एक लज्जास्पद प्रकार समोर आला आहे. यात डॉक्टरांनी अपघातात कापून वेगळा झालेल्या पायाचा अपघातग्रस्तासाठीच उशी म्हणून वापर केला आहे. या प्रकार माध्यमांसमोर येताच चीफ मेडिकल सर्जन डॉ. हरीश चंद्र यांनी एका वरिष्ठ डॉक्टरासह 4 जणांवर निलंबनाची कारवाई केली आहे. सोबतच या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष समिती स्थापन करून दोषींवर कठोर कारवाई करणार असे आश्वस्त केले आहे. 

 

शनिवारी घडला अपघात
- घनश्याम (25) झांसीच्या शालेय बसचा क्लीनर आहे. बस शालेय विद्यार्थ्यांना शनिवारी घेऊन जात होती. त्याचवेळी समोरून येणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरपासून वाचण्याच्या प्रयत्ना ती बस उलटली. 
- या अपघातात 6 विद्यार्थी जखमी झाले. तर घनश्यामचा पाय कापल्या गेला. त्याला उपचारासाठी झांसी मेडिकल कॉलेजच्या एमरजेंसी विभागात आणले. त्याच ठिकाणी डॉक्टरांनी त्याला बेडवर झोपवताना त्याच्याच पायाचा उशी म्हणून वापर केला. त्याचे फोटो सुद्धा समोर आले आहेत.

 

डॉक्टर काय म्हणाले?
- मेडिकल कॉलेजच्या प्रिन्सिपल साधना कौशिक यांनी आरोप अपघातग्रस्ताच्या मित्रमंडळींवर ढकलला आहे. ''आम्ही या घटनेनंतर विभागातील लोकांशी बातचीत केली. तसेच वरिष्ठ डॉक्टर, ईएमओ, सीनिअर नर्स आणि एका दुसऱ्या कर्मचाऱ्याला सस्पेंड करण्यात आले आहे.''
- ''इमरजेंसी वार्डमध्ये डॉक्टरांनी जखमी क्लीनरवर लागलीच उपचार सुरू केले होते. अपघातग्रस्ताचे डोके वर ठेवण्याकरिता त्याखाली काही ठेवण्यासाठी डॉक्टरांना लागत होते. त्याचवेळी अपघातग्रस्ताच्या एका सहकाऱ्याने त्याचा कापलेला पाय डोक्याखाली ठेवून दिला. एका विशेष समितीकडून या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. तसेच दोषींवर कारवाई केली जाईल.''

बातम्या आणखी आहेत...