आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गेल्यावर्षी 126 युवक दहशतवादी संघटनात सामिल, 2016 पेक्षा 38 ने संख्या वाढली - मुख्यमंत्री महबूबा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील तरुणांचा दहशतवादाकडे ओढा वाढत आहे. प्रत्येक वर्षी ही संख्या वाढत चालली आहे. 2016 मध्ये 88 तरुण दहशतवादी संघटनांकडे आकृष्ट झाले तर 2017 मध्ये हा आकडा38 ने वाढून 126वर गेला आहे. मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी मंगळवारी विधानसभेत ही माहिती दिली.

 

नॅशनल कॉन्फरन्सच्या प्रश्नावर महबूबांनी दिले उत्तर 
- न्यूज एजन्सीच्या वृत्तानुसार, महबूबा यांनी विधानसभेत लिखित उत्तर दिले. त्यात म्हटले आहे, '2015 मध्ये 66, 2016 मध्ये 88 आणि 2017 मध्ये 126 तरुण दहशतवादी संघटनांमध्ये जॉइन झाले.'
- नॅशनल कॉन्फरन्सचे नेते अली मोहम्मद यांनी सरकराला विचारले होते की खोऱ्यातील किती तरुण दहशतवादी झाले आहेत? 
- न्यूज एजन्सीच्या रिपोर्टनुसार, काश्मीरमध्ये गेल्या सात वर्षांच्या तुलनेत 2017 मध्ये  सर्वाधिक तरुणांनी दहशतवादी संघटना जॉइन केली आहे. मात्र जम्मू-काश्मीरचे डीजीपी एस.पी. वैद यांनी हे नाकारले होते. 


काश्मिरच्या तरुणांचा दहशतवादाकडे वाढता ओढा 
- गेल्यावर्षी मार्चमध्ये संसदेत एक अहवाल सादर करण्यात आला होता. त्यानुसार, 2014 पासून खोऱ्यात तरुणांनी हातात शस्त्र घेण्याचे प्रमाण वाढले आहे. 
- या अहवालानुसार, 2010 मध्ये 54 तरुण दहशतवादी मार्गावर गेले होते. त्यापुढील तीन वर्षात तरुणांनी दहशतवादी होण्याचे प्रमाण कमी झाले होते. 
- 2011 मध्ये काश्मीरमध्ये 23, 2012 मध्ये 21 आणि 2013 मध्ये फक्त 16 तरुण या मार्गावर गेले होते. 
- 2014 पासून काश्मीरी तरुणांचे दहशतवादी होऊन शस्त्र हातात घेण्याचे प्रमाण वाढले आहे. यावर्षी 54 तरुण दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी झाले होते. 2015 मध्ये 66, 2016 मध्ये 88 तरुणांनी दहशतवादाचा मार्ग पत्करला होता. 

 

बुऱ्हानच्या एन्काऊंटरनंतर तरुणांची संख्या वाढली 
- 8 जुलै 2016 मध्ये सेक्यूरिटी फोर्सने हिजबूल मुजाहिदीन दहशतवादी संघटनेचा दहशतवादी बुऱ्हान वानी याचा एन्काऊंटर केला होता. बुऱ्हान हा काश्मीरचा पोस्टर बॉय मानला जात होता. 
- दुसरीकडे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की 1990 च्या दशकातील दहशतवाद आणि आताच्या दहशतवादात फरक आहे. पहिल्यापेक्षा आताच्या तरुणांमध्ये दहशतवादी विचारधारा अधिक मजबूत आहे. 

बातम्या आणखी आहेत...