आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप कार्यकर्त्यांचा राज्यमंत्री नाथ यांना तीन तास घेराव; त्रिपुरातील नाट्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आगरतळा- त्रिपुराच्या समाज कल्याणमंत्री बिजिता नाथ यांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी धर्मानगरच्या बागबासाच्या टांगीबाडी या आदिवासी गावात गुरुवारी रात्री तीन तासांपर्यंत घेराव घातला होता. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीने मध्यरात्री बाराच्या सुमारास त्यांना गावातून सुरक्षितपणे बाहेर काढावे लागले.  


भाजप कार्यकर्त्यांनी मंत्र्यांवर ग्रामीण भागातील मतदारांत पैसे वाटपाचा आरोप केला. मंत्री गेल्या तीन-चार दिवसांपासून गावात रात्रीच्या वेळी येत होत्या. मात्र बिजिता यांनी आपल्यावरील आरोपांना फेटाळून लावले. गावातील गरीब लोक दिवसभर कामावर गेलेले असतात. त्यामुळे गावात प्रचारासाठी उशिरा रात्री जावे लागत होते.  बागबासाचे एक नेता प्रमेश देबनाथ म्हणाले, मंत्री बिजिता एक दिवसापूर्वी आल्या होत्या. तेव्हा त्यांनी दुसऱ्या दिवशी येऊन पैसे देण्याचे आश्वासन दिले होते. गुरुवारी उशिरा रात्री त्यांचे आगमन झाल्यानंतर गावकऱ्यांनी त्यांना विरोध केला. त्यांना गावात प्रवेश करण्यास मनाई केली. 

बातम्या आणखी आहेत...