आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गळा कापून 11th विद्यार्थीनीची हत्या, भावासमोरच तडपून तडपून सोडला जीव...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इलाहाबाद- यमुनापार मेजा परिसरात बुधवारी संध्याकाळी शाळेतून घरी परतणाऱ्या 11वीच्या विद्यार्थीनीची टोस नदीच्या काठावर गळा कापून हत्या करण्यात आली. मुलीच्या पूढे आलेल्या विद्यार्थ्यांनी सांगिले की, सायकलवरून पाठलाग करणाऱ्या तरूणाने आधी पीडित विद्यार्थीनीला फरपटत नेण्याचा प्रयत्न केला. तिने आरडाओरड सुरू करताच आरोपीने चाकून तिचा गळा कापून हत्या केली. तिचा जाग्यावर मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी तरूण तेथून पसार झाला. संशयाच्या आधारावर पोलिसांना एका तरूणाला ताब्यात घेतले आहे.

 

शेजारील गावातील शाळेत पायी जात होती मुलगी...
मेजा रोडवरील तिवारी बद्रीनाथ इटरमीडिएट कॉलेजमध्ये मृत मुलगी 11वीत शिकत होती. घरापासून गावातील इतर विद्यार्थ्यांसोबत ती रोज पायी ये-जा करत होती. 


लोक पोहोचण्यापूर्वी झाला मृत्यू...
- शाळेतून परतनाऱ्या विद्यार्थ्यांनी घडलेल्या घटनेची माहिती गावतील लोकांना दिली. गावातून लोक घडनास्थळी पोहोचले, परंतु तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.
- माहिती मिळताच घडनास्थळी डॉग स्कॉडसह पोहोचलेल्या पोलिसांना कोणताही ठोस पूरवा मिळालेला नाही.


पोलिस काय म्हणतात...
- एसपी यमुनापार दीपेंद्र चौधरी यांनी सांगितले की, आद्याप हत्येचे कारण स्पष्ट झाले नाही. एकतर्फी प्रेमातून घटाना घडल्याची शक्यता आहे. पोलिस सर्व पद्धतीने चौकशी करत आहेत. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला असून चौकशीसाठी एका संशयीत तरूणाला ताब्यात घेण्यात आले आहे.


पुढील स्लाइडवर वाचा अशी घडली घटना....

बातम्या आणखी आहेत...