आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BScच्या विद्यार्थीनीवर 2 महिने बलात्कार, ते रोज टॅबलेट देऊन करत होते असे काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मैनपूरी (उत्तर प्रदेश)- येथील एका BScच्या विद्यार्थीनीला काही नराधमांनी तिच्याच घरात तेल टाकून जाळून टाकले. भाजलेल्या विद्यार्थीनीवर सध्या रूग्नालयात उपचार सूरू असून तिची परिस्थीती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन महिन्यांपासून आरोपी नातेवाइकांना जिवे मारण्याची धमकी देत तरूणीवर बलात्कार करत होते.

दोन महिन्यांपासून होत होत बालात्कार...
- मैनपूरी येथील Bsc च्या विद्यार्तीनीवर काही नारधम गेल्या दोन महिन्यापासून बलात्कार करत होते.
- पीडित तरूणीने सांगितले की, कॉलनीती पंजी जटाव यांने माझी ओळख एक तरूणाशी करून दिली होती. मी भाऊ समजून त्याच्याशी बोलत होते. एक दिवस पंचीने मला भेटायला बोलवले. तेथे आधीच उपस्थीत असलेले सचिन आणि आशिष यांच्यासोबत मिळून त्याने माझ्यावर बलात्कार केला.
-  यामुळे मी घाबरले होते. त्या दिवसानंतर ते रोज मला ब्लॅकमेल करत होते.
- मला एक टॅबलेट देऊन ती आई-वडिलांना खाऊ घाल असे ते सांगत होते. रात्री ते झोपी गेल्यानंतर आरोपी घरात घुसून मला टॉर्चर करत होते.
- 12 डिसेंबरला माझा संयम तुटला आणि मी सर्व प्रकार कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर त्याच्यासोबत पोलिसांत जाऊन आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी कारवाही करू असे सांगितले.
- 13 डिसेंबरला मी घरी एकटी बसून टीव्ही पाहत होते. तेव्हा तिन्ही आरोपी घरात घुसले आणि त्यांनी माझ्यावर रॉकेल टाकून मला पेटवून दिले. माझी आरडा-ओरड ऐकून शेजारील लोक जमा झाले आणि मला दवाखाण्यात दाखल केले.
- पीडितेच्या कुटुंबीयांनी म्हणाले, आरोपींविरोधात कठोरातील कठोर कारवाही करण्यात यावी. 

 

एएसपी ओपी सिंह यांनी सांगितले की, तीन तरूणांनी घरात घुसून एका विद्यार्थीनीवर रॉकेल टाकून तिला पेटवून दिले. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून फरार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.
 


पुढील स्लाइडवर वाचा तरूणीने सांगतिले कसे आत्याचार करत होते नराधम...

बातम्या आणखी आहेत...