आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींची निवडणुकीच्या आधी कर्नाटकला 7200 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची भेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मैसुरू- कर्नाटकमध्ये एप्रिल-मेमध्ये विधानसभा निवडणुकीची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या निवडणूक दौऱ्यावर सोमवारी मैसुरूत आले. १५ दिवसांत मोदींचा कर्नाटकचा हा दुसरा दौरा आहे. ते ५ फेब्रुवारीला बंगळुरूला आले होते. मोदी सर्वात आधी श्रवणबेळगोळ येथे भगवान बाहुबलींच्या महामस्तकाभिषेक उत्सवात सहभागी झाले. त्यांनी १४० किमी लांबीच्या मैसुरू-बंगळुरू इलेक्ट्रिक रेल्वेमार्गाचे लोकार्पण केले. 


मैसुरू-उदयपूरदरम्यानची हमसफर एक्स्प्रेसला रवाना केले. मैसुरूत एका जाहीर सभेला संबोधित केले. मोदींनी कर्नाटकात निवडणुकीआधी ७२०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांची घोषणा केली. मैसुरूच्या सभेत मोदी म्हणाले की, रेल्वेत आम्ही आधीच्या तुलनेत चौपट काम केले आहे. तुम्हाला कर्नाटकमध्ये कमिशन सरकार हवे की मिशन सरकार? येथे १०% पेक्षा जास्त कमिशन घेणारे सरकार आहे. आता कर्नाटकला वेगाने विकास करण्याची गरज आहे.  


१५ दिवसांत मोदींनी कर्नाटकसाठी मंजूर केले २४ हजार कोटींचे प्रकल्प  
सहापदरी महामार्ग : ६४०० कोटी  

मोदी म्हणाले, बंगळुरू-मैसुरू राष्ट्रीय महामार्ग सहापदरी केला जाईल. त्यासाठी ६४०० कोटींचा खर्च येईल. ११७ किमी लांबीच्या या महामार्गाचे काम दोन टप्प्यांत सुरू होईल.  


सॅटेलाइट स्टेशन : ८०० कोटी रु.  
राज्यात रेल्वेगाड्या वाढत आहेत. त्यामुळे मैसुरूजवळ सॅटेलाइट स्टेशन तयार करू. ते जागतिक दर्जाचे असेल. त्यावर ८०० कोटी खर्च केले जातील, अशी घोषणा मोदींनी केली.  


हमसफर एक्स्प्रेस :४ राज्ये जोडणार  
मोदींनी हमसफर एक्स्प्रेसला हिरवी झेंडी दाखवली. ही गाडी मैसुरू-उदयपूरदरम्यान धावेल. ती ४ राज्यांना जोडेल. पर्यटनाच्या बहाण्याने भाजपने मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.  


प्रलंबित ९ लाख काेटी रुपयांचे प्रकल्प लावले मार्गी
मैसुरू येथील प्रचारसभेत बाेलताना मोदी म्हणाले की, पूर्वीच्या सरकारांनी नागरिकांच्या डाेळ्यात धूळफेक केली. संसदेत घाेषित केलेल्या; परंतु वास्तवात न उतरलेल्या अशा १,५०० हून अधिक घाेषणा निदर्शनास अाल्या. सध्या मी प्रगती नावाचा कार्यक्रम हाती घेतला अाहे. या माध्यमातून प्रलंबित प्रकल्प मार्गी लावण्याचे काम सुरू अाहे. त्या अंतर्गत अातापर्यंत नऊ लाख काेेटींचे असे प्रकल्प पुन्हा सुरू केले, जे लालफितीत अडकलेले हाेते. त्या काळात ज्या प्रकल्पांचे मूल्य ३० हजार काेटी हाेते, तेच अाता ८० हजार काेटींपर्यंत पाेहाेचले अाहे.


भाजपचे दाेन सर्वात माेठे नेते एकाच वेळी कर्नाटकात
पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्याशिवाय पक्षाचे अध्यक्ष अमित शहा हेदेखील कर्नाटकात गेले अाहेत. ते तीन दिवस राज्यातील किनारपट्टी भागातील निवडणूक प्रचारसभा व इतर कार्यक्रमांत सहभागी हाेतील. त्यांनी अंकाेला व कुशालनगरमधील सुरतकलपर्यंत पदयात्रा काढली अाहे. या पदयात्रेला भाजपच्या राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रचाराची सुरुवात मानले जात अाहे.


बंगळुरूत १७ हजार काेटी देण्याची केली हाेती घाेषणा
यापूर्वी ५ फेब्रुवारीला पंतप्रधान माेदी हे बंगळुरूत गेले हाेते. तेथे त्यांनी परिवर्तन यात्रेच्या सभेत शहरात १७ हजार काेटी खर्चून १६० किमी लांब उपनगरीय रेल्वेचे काम सुरू करण्यात येणार असल्याची घाेषणा केली हाेती. केवळ कर्नाटकात ८२ हजार काेटींच्या ४२ माेठ्या प्रकल्पांची कामे सुरू अाहेत. त्यातील ३३ प्रकल्प रेल्वे व रस्त्यांशी निगडित अाहेत.


श्रवणबेळगाेळ : येथे २५ वर्षांनंतर गेले पंतप्रधान; रुग्णालयाचे केले उद््घाटन
श्रवणबेळगाेळ येथे साेमवारी २५ वर्षांनंतर एखादे पंतप्रधान गेले. माेदींनी श्रवणबेळगाेळ येथे भगवान बाहुबलीच्या महामस्तकाभिषेक कार्यक्रमात सहभागी हाेण्यापूर्वी एका रुग्णालयाचे उद््घाटन केले. समाजाला १२ वर्षे काेठे न्यायचेय व काेणत्या मार्गावर चालायचे अाहे, याचे चिंतन या ठिकाणी सर्व मिळून करत अाहेत. देशाच्या कानाकाेपऱ्यातील संत, अाचार्य, साधू-साध्वी त्यांच्या भागातील अनुभव घेऊन येतात. ते येथे चिंतन करतात व त्यांच्या चिंतनातून समाजाला अमृताच्या रूपाने प्रसाद मिळताे, असे माेदी म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...