आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी म्हणाले - आता काँग्रेसही प्रादेशिक पक्ष, विरोधक फक्त मला हटवण्यासाठी एकत्र आलेत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

- मोदी म्हणाले-राहुल गांधींना पंतप्रधान बनायचे आहे. पण ममता त्यासाठी तयार नाहीत आणि ममतांवर डाव्यांना आक्षेप आहे. 

- मोदीसाठी असलेला द्वेष हेच विरोधक एकत्र येण्याचे एकमेव कारण आहे. त्यांचा आघाडी जनतेसाठी नाही. 

 

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भाजप 2019 ची लोकसभा विकास आणि सुशासनाच्या मुद्द्यावर लढणार आहे. ते म्हणाले, काँग्रेस केवळ प्रादेशिक पक्ष म्हणून शिल्लक आहे. फक्त पंजाब, पुद्दुचेरी आणि मिझोरममध्ये त्यांची सत्ता आहे. दिल्ली, आंध्र, सिक्किममध्ये त्यांचे प्रतिनिधीत्वच नाही. उत्तर प्रदेश आणि बिहार मध्येही त्यांच्या शक्तीबाबत सर्वांना माहिती आहे. विरोधकांकडे मोदीला हटवण्याशिवाय दुसरा मुद्दाच नाही. 


स्वराज्य मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत मोदी म्हणाले, 2014 नंतर संपूर्ण देशात आम्हाला जनतेचा आशिर्वाद मिळाला. एकापाठोपाठ एक राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये आम्हाला ऐतिहासिक जनादेश मिळाले. अशा परिस्थितीत जनता आम्हाला नक्की आणखी एक संधी देईल यावर आम्हाला विश्वास आहे. 

 

1977 आणि 1989 मध्ये देशहितासाठी झाली होती आघाडी 
महाआघाडीबाबत मोदी म्हणाले की, 1977 आणि 1989 बरोबर या आघाडीची तुलना करणे योग्य नाही. 1977 मध्ये आघाडीचा उद्देश लोकशाहीचे संरक्षण हा होता. कारण आणीबाणीच्या काळात लोकशाही धोक्यात आली होती. 1989 मध्ये बोफोर्सच्या विक्रमी घोटाळ्याने संपूर्ण देशाला इजा पोहोचली. पण आजची महाआघाडी हे केवळ राजकारण आणि स्वहिताने प्रेरित आहे. यांच्याकडे मला हटवण्याशिवाय दुसरा मुद्दा नाही. 


पंतप्रधान बनण्याची स्पर्धा 
मोदी म्हणाले, देशात फक्त पंतप्रधान बनण्यासाठी विरोधकांमध्ये स्पर्धा आहे. राहुल गांधी म्हणतात ते पंतप्रधान बनायला तयार आहेत. पण ममता त्यासाठी राजी नाहीत. त्यांनाच पंतप्रधान बनायचे आहे. पण डाव्यांना ते मंजूर नाही. समाजवादी पार्टीला वाटते इतर नेत्यांच्या तुलनेत त्यांच्या नेत्यांना पंतप्रधान बनण्याचा अधिक अधिकार आहे. सगळे राजकारण सुरू आहे. जनतेच्या विकासासाठी काही नाही. 

 

बातम्या आणखी आहेत...