आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवजात मुलीला कारमधून फेकून आईने काढला पळ, CCTV मध्ये कैद झाला दुर्दैवी प्रसंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सीसीटीव्ही मध्ये बाळाला सोडून जाणारी कार स्पष्ट दिसते. - Divya Marathi
सीसीटीव्ही मध्ये बाळाला सोडून जाणारी कार स्पष्ट दिसते.

मुजफ्फरनगर (उत्तर प्रदेश) - जन्मदात्रीने आपल्या 2-3 दिवसांच्या मुलीला रस्त्यावर सोडून पळ काढल्याची घटना येथे घडली आहे. कारमधून आलेल्या एका आईने आपले नवजात बाळ रस्त्यावर टाकले आणि निघून गेली, ही घटना सीसीटीव्हीमुळे समोर आली आहे. बाळाने जेव्हा टाहो फोडला तेव्हा परिसरातील नागरिकांचे त्याच्याकडे लक्ष गेले. बेवारस पडलेल्या बाळाला तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. 

 

कुठे घडली घटना 
- शहरातील मुस्तफा गल्लीमध्ये बुधवारी एक कार आली. कारमध्ये बसलेल्या महिलेने आपल्या हातातील बाळ रस्त्यावर टाकले आणि निघून गेली. ही महिला बाळाची आई असली पाहिजे, असा पोलिसांचा अंदाज आहे. 
- रस्त्यावर बेवारस पडलेले बाळ जेव्हा रडायला लागले तेव्हा या भागातील नागरिकांचे त्याच्याकडे लक्ष गेले. बाळा भोवती जमा झालेल्या लोकांनी या घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना दिली. पोलिस येईपर्यंत लोकांनी बाळाला जवळ घेऊन त्याचा लाड करत होते. 
- रस्त्यावर सापडलेले बाळ हे मुलगी आहे. परिसरात राहाणारे मोहम्मद सुजाइलाही यांनी सांगितले की मुलगी जोरजोरात रडत होती. आम्ही या घटनेची माहिती लागलीच पोलिसांना कळवली. 

 

CCTV मध्ये स्पष्ट दिसते बाळाला सोडून जाणारी महिला 
- सीसीटीव्ही मध्ये स्पष्ट दिसते की एक सँट्रो कार घराच्या गेटसमोर येऊन उभी राहाते. खिडकीतून एक महिला कपड्यात गुंडाळलेली 2-3 दिवसांची मुलगी ओट्यावर ठेवते आणि कार निघून जाते. 
- वैद्यकीय अधिकारी पी.एम. मिश्रा म्हणाले, मुलीला हॉस्पिटलच्या नर्सरीमध्ये ठेवले आहे. मुलीला दत्तक घेण्याची अनेकांनी इच्छा व्यक्त केली आहे. मात्र कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर कारवाई केली जाईल. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, सीसीटीव्ही फुटेज... 

बातम्या आणखी आहेत...