आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बसपचे आमदार मुख्तार अन्सारी यांना तुरुंगात हार्ट अटॅक, कानपूर रुग्णालयात हलवले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बांदा - बाहुबली नेते आणि आणदार मुख्तार अन्सारी यांना बांदा तुरुंगात हार्ट अटॅक आला आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना कानपूरला हलवण्यात येत आहे. दुसरीकडे अन्सारी यांच्या पत्नीलाही हार्ट अटॅक आला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 12 वर्षांपासून तुरुंगात कैदेत असलेल्या मुख्तार अन्सारी यांना मायावतींनी तिकिट दिले होते. ते निवडूनही आले होते.  


पती-पत्नी दोघांनाही हार्ट अटॅक 
- मुख्तार अन्सारी यांची पत्नी अफसा अन्सारी यांनाही हार्ट अटॅक आला. त्या अन्सारी यांना भेटायला गेल्या होत्या. दोघांवर उपचार सुरू आहेत.  
- मुख्तार अन्सारी बसप नेते आहेत. ते आजमगड जिल्ह्यातील मऊ विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. एडीजी जेल पीके मिश्रा यांनी सांगितले की, गंभीर स्थितीत असलेल्या अन्सारी यांना कानपूरला रेफर करण्यात आले आहे. 


2005 पासून तुरुंगात 
- ऑक्टोबर 2005 मध्ये मऊ जिल्ह्यामध्ये हिंसाचार भडकला होता. त्यानंतर मुख्तार अन्सारी यांच्यावर अनेक आरोप लागले. पण ते सर्व आरोप फेटाळले गेले. त्याच दरम्यान त्यांनी गाझीपूर पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. तेव्हापासून ते तुरुंगात आहेत. 
- याच दरम्यान कृष्णानंद राय यांच्याकडून मुख्‍तार यांचे भाऊ अफजल अन्सारी पराभूत झाले. मुख्तार यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी शार्प शूटर मुन्ना बजरंगी आणि अतिकुर्रह्मान उर्फ बाबू याच्या मदतीने कृष्णानंद राय यांची त्यांच्या 5 सहकाऱ्यांसह हत्या केली होती. 
- 2010 मध्ये अन्सारींवर राम सिंह मौर्य यांच्या हत्येचा आरोप लागला. मौर्य, मन्नत सिंह नावाच्या एका स्थानिक ठेकेदाराच्या हत्येचे साक्षीदार होते. मुख्तार आणि त्यांच्या दोन्ही भावांचे 2010 मध्ये बसपमधून निलंबन करण्यात आले होते. 

 

हेही वाचा...

अशी होती या आमदाराची दहशत: एके 47 मधून 400 राउंड फायर, 7 जणांच्या बॉडीमधून निघाल्या 67 गोळ्या..

 

बातम्या आणखी आहेत...