आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटक : काँग्रेसने मुस्लिम आमदाराला उपमुख्यमंत्री करावे, मुस्लिम संघटनांची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरु - कर्नाटकमध्ये धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस)-काँग्रेस आघाडीचे सरकार स्थापन होणार आहे. जेडीएसचे नेते कुमारस्वामी बुधवारी सायंकाळी 4.30 वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्याआधी मुस्लिम संघटनांकडून उपमुख्यमंत्रीपद मुस्लिम आमदाराला मिळावी अशी मागणी केली जात आहे. काँग्रसेमधील रोशन बेग या मुस्लिम आमदाराचे नाव यामुळे चर्चेत आले आहे. 

 

दोन उपमुख्यमंत्री राहाण्याची शक्यता 
- कर्नाटकमध्ये दोन उपमुख्यमंत्री राहातील अशी शक्यता आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जी परमेश्वर यांनी याचे संकेत रविवारी दिले होते. 
- परमेश्वर हे उपमुख्यमंत्री राहाणार असल्याची चर्चा आहे. त्यातच आता मुस्लिम संघटनांनी 7 वेळा आमदार राहिलेल्या रोशन बेग यांचे नाव पुढे केले आहे. बेग किंवा दुसऱ्या एखाद्या मुस्लिम आमदाराला उपमुख्यमंत्री करण्याची मागणी करण्यात आली आहे. 
- जेडीएसनेही दोन उपमुख्यमंत्री राहाणार असल्याचे वृत्त नाकारलेले नाही. त्यामुळे दोन उपमुख्यमंत्री राहातील हे जवळपास निश्चित मानले जात आहे. मात्र यात लिंगायत आणि मुस्लिम असा सामाजिक समतोल राखला जातो, की काँग्रेस-जेडीएसकडे आणखी काही फॉर्म्यूला आहे, हे लवकरच स्पष्ट होईल. 

 

30-30 महिन्यांचा फॉर्म्यूला नाकारला 
काँग्रेस-जेडीएसच्या तडजोडीच्या राजकारणाने कर्नाटकमधील राजकीय नाट्याच्या दुसऱ्या अंकाला सुरुवात झाली आहे. धर्मनिरपेक्ष जनता दलाचे (जेडीएस) नेते एच.डी. कुमारस्वामी यांनी 30-30 महिन्यांचे मुख्यमंत्रीपद हा फॉर्म्यूला सपशेल नाकारला आहे. त्यानंतर काँग्रेसकडून विधानसभाध्यक्ष पदासह उपमुख्यमंत्रीपदावर दावा सांगितला जात आहे. 

- कुमारस्वामींनी सोमवारी सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतली. त्यांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले आहे. त्यासोबतच बसपा सुप्रीमो मायावती यांची भेट घेऊन त्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले. 

बातम्या आणखी आहेत...