आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुल होण्यासाठी मुस्लीम कुटुंबाचा गंगेला नवस, पूर्ण करण्यासाठी हिंदु पद्धतीने काढले जावळे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेगूसराय - बिहारच्या बेगुसराय जिल्ह्यात एका मुस्लीम कुटुंबाने दोन मुलांचे गंगेच्या घाटावर पारंपरिक हिंदु पद्धतीने मुंडन केले आहे. ते कुटुंब युपीच्या धधरा येथील राहणारे आहे. त्यांना एकही अपत्य नव्हते. त्यामुळे त्यांनी मुल व्हावे यासाठी गंगा मातेला नवस केला होता. हा नवस पूर्ण झाल्यानंतर ते नवस पूर्ण करण्यासाठी सिमरिया घाटावर पोहोचले. स्थानिकांनी हे धार्मिक सदभावनेचे उत्तम उदाहरण असल्याचे म्हटले आहे. 


सगळीकडे चर्चा
- मुलांचे वडील जागीर खान यांनी सांगितले, गंगा मातेच्या आशिर्वादाने मला दोन मुले झाली. रविवारी आम्ही नवस पूर्ण करण्यासाठी आम्ही आलो होतो. 
- आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, जर स्वच्छ मनाने गंगामातेला काहीही मागितले तर ती इच्छा पूर्ण होते. गंगा माता धर्माच्या नावावर भेदबाव करत नाही, तर आपण का करायचा. 
- जागीर म्हणाले, त्यांनी सिमरिया घाटावर संपूर्ण धार्मिक पद्धतीने दोन्ही मुलांची जावळे केली. 
- यानंतर संपूर्ण परिसरात याबाबत चर्चा सुरू आहे. 

 

 

बातम्या आणखी आहेत...