आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Narendra Modi And French President Emmanuel Macron Visit Varanasi News And Update

मोदींनी मॅक्राॅन यांना अर्ध्या तासात काशीच्या 30 घाटांवर रामराज्य ते बुद्धांपर्यंतची झलक दाखवली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाराणसी- भारत आणि फ्रान्स यांच्यात तीन वर्षांनी पुन्हा एकदा बोट डिप्लोमसीचे चित्र दिसले. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी वाराणसीला गेले. तेथे मोदी आणि मॅक्रॉन यांनी गंगेत बोटीवर बसून तीन किमीपर्यंत चर्चा केली. दोघे अस्सी घाटावरून नौकेत बसले आणि ३ किमीवरील दशाश्वमेध घाटावर पोहोचले. हे अंतर पार करण्यास अर्धा तास लागला. माेदींनी मॅक्राॅन यांना ३० घाटांवर रामराज्यापासून ते भगवान बुद्धांपर्यंतच्या भारताची झलक दाखवली. या वेळी उ. प्र.चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित होते. वाराणसीच्या घाटांवर हजर लोकांनी दोन्ही नेत्यांचे जोरदार स्वागत केले. मॅक्रॉन यांनी दशाश्वमेध घाटावर अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेतला. मोदींनी वाराणसीला घेऊन गेलेले मॅक्रॉन हे तीन वर्षांतील दुसरे राष्ट्राध्यक्ष आहेत.डिसेंबर २०१५ मध्ये जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबेंना वाराणसीला नेले हाेते.

 

४० शाळांचे विद्यार्थी भारत व फ्रान्सचे ध्वज घेऊन उभे हाेते
मॅक्राॅन यांनी काशीत मोदींसाेबत गंगेच्या घाटांवर या प्राचीन शहराची धार्मिक-सांस्कृतिक व अाध्यात्मिक झलक पाहिली. तुळशी घाटावर मुलींनी त्यांना कुस्तीत  धोबियापाट व पट डावाची कला दाखवली.  ३० घाटांवर ४० शाळांच्या ४,०००हून अधिक मुले भारत-फ्रान्सचे ध्वज घेऊन मोदी-मॅक्राॅन यांच्या स्वागतासाठी उभी हाेती. अस्सी घाटावर रचना अग्रवाल यांनी फ्रेंच भाषेत मॅक्राॅन यांना विचारले, कमातावु म्हणजे अापण कसे अाहात? हे एेकून मॅक्राॅन यांनी बोनजुर म्हणजे मी बरा अाहे, असे उत्तर दिले. तेथे बीएचयूच्या  फाइन आर्टच्या विद्यार्थ्यांनी दाेघांना गुलाबाचे फूल दिले व आरती केली.

 

 

राजकारण : भारताने फ्रान्सशी मैत्री करून चीन, पाकिस्तानला दाखवली ताकद
मॅक्रॉन यांच्या या दौऱ्यामुळे फ्रान्स आणि भारत विश्वासार्ह मित्र असल्याचा संदेश जगात गेला आहे. भारताने आधी आंतरराष्ट्रीय सौर आघाडी परिषद आणि नंतर बोट डिप्लोमसीद्वारे चीन आणि पाकिस्तानला आपली ताकद दाखवून दिली.

 

संस्कृती : सर्वात आधुनिक देशाच्या अध्यक्षाने सर्वात प्राचीन शहराची संस्कृती पाहिली
फ्रान्स जगातील सर्वात आधुनिक देश, तर वाराणसी हे जगातील सर्वात प्राचीन शहरांपैकी एक अाहे. मॅक्रॉन यांनी वाराणसीतील गल्ल्या व घाट पाहिले. प्राचीन कला आणि संस्कृतीचा आनंद घेतला. शहनाईवादन ऐकून शिल्प आणि हस्तकलाही पाहिली.

 

 

भेट : मोदी १२ व्या वेळा अापल्या संसदीय क्षेत्रात गेले; ७५२ काेटींचे प्रकल्प केले सुरू
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १२ व्या वेळा रविवारी अापल्या संसदीय क्षेत्रात गेले. तेथे त्यांनी ७९२ काेटी रुपयांचे सुमारे दोन डझन प्रकल्प लॉन्च केले. तसेच महिला संवाद कार्यक्रमात त्यांनी १२ महिलांना घराच्या चाव्या सुपूर्द केल्या.

 

मॅक्राॅन यांनी केले साैरऊर्जा प्रकल्पाचे उद‌्घाटन; १.५ लाख घरांना मिळेल वीज 

राष्ट्राध्यक्ष मॅक्राॅन यांनी उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे १०० मेगावॅटच्या साैरऊर्जा प्रकल्पाचे उद‌्घाटन केले. हा यूपीतील सर्वात माेठा साैरऊर्जा प्रकल्प अाहे. ३८० एकरातील या प्रकल्पात १.१८ लाख सोलर पॅनल अाहे. याची उभारणी फ्रान्सची कंपनी एनगीने ५०० काेटी रुपये खर्च करून केली अाहे. येथे दरवर्षी १५.६ काेटी युनिट व दर महिन्याला एक काेटी ३० लाख युनिट वीजनिर्मिती हाेईल. येथून रोज १.५ लाख घरांना वीज मिळू शकेल. भारताने अपारंपरिक ऊर्जेतून २०२२ पर्यंत १७५ गिगावॅट वीजनिर्मितीचे  उद्दिष्ट ठेवले अाहे. त्यावर ५ लाख काेटी रुपये खर्च हाेतील. भारत व फ्रान्सच्या सहकार्याने महाराष्ट्रातील जैतापुरात जगातील सर्वात  माेठा अणुऊर्जा प्रकल्प साकारत अाहे.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, १०१ वैदिक ब्राह्मण व बटूंनी मंत्राेच्चार करून मोदी-मॅक्राॅन यांचे केले स्वागत आणि अन्‍य फोटो, माहिती...

बातम्या आणखी आहेत...