आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक कुटूंबाने 10 वर्ष रिमोटने सरकार चालवले, 48 वर्षात विकास का केला नाही: मोदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई- एक कुटूंबाने 10 वर्ष रिमोटने सरकार चालवले. देशात गेली 48 वर्षे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्यांची सत्ता होती. त्यांनी काय विकास केला, असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला आहे. 

 

 

मोदींनी विचारले आपण मागे का पडलो

पुदुच्चेरी येथे ऑरोविल इंटरनॅशनल शहराच्या सुवर्ण महोत्सवीवर्षानिमित्त कार्यक्रमात बोलत होते. यावेळी पंतप्रधान म्हणाले, पुदुच्चेरीचा विकास का खुंटला आहे, याचे उत्तर येथील सरकारने द्यायला हवे. देशभरात सध्या वेगाने विकास होत असताना येथे असे काहीही पहायला मिळत नाही असा दावा त्यांना उपस्थितांसमोर बोलताना केला. एकेकाळी येथील कपडा व्यवसायाचे क्षेत्र समृद्ध होते मात्र, आता त्याला रया गेली आहे. येथील सहकार क्षेत्रही जवळजवळ मरणासन्न अवस्थेत असल्याचे ते यावेळी म्हणाले.

 

 

कॉग्रेसच्या 48 वर्षांशी आमच्या 48 महिन्यांची तुलना

आमच्या सरकारला मे महिन्यांत 48 महिने पूर्ण होत आहेत. तर देशात गेल्या 48 वर्षांपासून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्यांची सत्ता होती. या दरम्यान, आपण काय कमावले आणि काय गमावले हे जनतेने ठरवावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले 

 

 

पंतप्रधान मोदी म्हणाले, जेव्हा अरविंद घोष यांनी इंग्रजांपासून जीव वाचवत पुदुच्चेरी येथे आश्रय घेतला. तेव्हा तुम्ही लोकांनी त्यांना जवळ करुन ज्ञान गुरु बनवले. त्याचबरोबर कवी भारती देखील येथे आले तेव्हा तुम्ही त्यांचे मनापासून स्वागत केले. त्यामुळे पुदुच्चेरीनेच त्यांना राष्ट्रकवी म्हणून मोठे व्हायला मार्ग आखून दिला.त्याचबरोबर स्वातंत्रसैनिक श्री वाचिनादन यांचे देखील पुदुच्चेरीतील लोकांनी मनापासून स्वागत केले. त्यामुळे राष्ट्र निर्माणासाठी तसेच स्वातंत्र्यासाठी पुदुच्चेरीचे योगदान एक परंपरा राहिली आहे. जी आम्हाला अजूनही गौरवपूर्ण वाटते. पारतंत्र्याच्या काळात इंग्रज भारतातील जी वर्तमानपत्रे छापणे गुन्हा मानत होते. ती वर्तमानपत्रे पुदच्चेरीने छापली. येथील लोकांनी एक नव्हे तर दोन स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतल्याचे यावेळी मोदी म्हणाले.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

 

 

बातम्या आणखी आहेत...