आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी आज बंगालमध्ये, ममता बॅनर्जी-शेख हसीनांसोबत बांगलादेश भवनाचे करणार उद्घाटन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता / रांची - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगाल आणि झारखंड दौऱ्यावर आहेत. बंगालमधील शांती निकेतन येथील हेलिपॅडवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी मोदींचे स्वागत केले. राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी हे मोदींच्या स्वागतासाठी कोलकाता विमानतळावर उपस्थित होते. मोदी आज विश्व भारती विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्याला उपस्थित राहाणार आहेत.       या कार्यक्रमामध्ये बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीनाही उपस्थित राहाणार आहेत. त्यांचे स्वागत मोदी करतील. त्यानंतर उभय नेते बांगलादेश भवनाचे उद्घाटन करतील. भारत-बांगलादेश सांस्कृतिक संबंधांचे ते प्रतीक आहे. या भवनाच्या उभारणीसाठी 25 कोटी रुपये खर्च करण्यात आले. यानंतर मोदी झारखंडला रवाना होतील. तिथे ते 27 हजार कोटींच्या विविध योजनांचा शिलान्यास करतील. 

37 दिवसांनंतर पुन्हा भेटणार मोदी-हसीना 
- नरेंद्र मोदी आणि शेख हसीना यांची 37 दिवसांतील ही दुसरी भेट आहे. याआधी उभय नेत्यांची 18 एप्रिल रोजी कॉमनवेल्थ परिषदेदरम्यान लंडनमध्ये भेट झाली होती. 
- पंतप्रधान शेख हसीना शुक्रवार आणि शनिवार दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात भारत-बांगलादेशच्या प्रमुख नेत्यांची बैठक होईल. या बैठकीत रोहिंग्या मुस्लिम आणि नदी जल वाटपावर चर्चा होण्याची शक्यता आहे. 

 

असा आहे मोदींचा कार्यक्रम 
- पंतप्रधान दिल्लीहून कोलकात्याला पोहोचले आहेत. 
- शांती निकेतन येथील दीक्षांत समारोहानंतर हेलिकॉप्टरने ते दुपारी 3.20 वाजता सिंदरी येथील बलियापूर येथे पोहोचतील. 4.20 वाजता ते सभेला संबोधित करतील. 
- मोदी 5 वाजता रांचीला पोहोचतील. येथील विमानतळाच्या जुन्या टर्मिनलवर राज्याच्या 19 मागास जिल्ह्यांच्या जिल्ह्याधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक होईल. यावेळी मोदी रांची गॅस पाइप लाइन योजनेचा शिलान्यास करतील. जवळपास संध्याकाळी 7.30 वाजता विशेष विमानाने ते दिल्लीला रवाना होतील. 

 

बातम्या आणखी आहेत...