आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CM ममता बॅनर्जींना मार्गदर्शन करताना दिसले मोदी, दीक्षांत सोहळ्याला दोन देशांचे पंतप्रधान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता -  दोन देशांचे पंतप्रधान विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्याला उपस्थित राहाण्याचा योग आज बंगालमध्ये आला होता. विश्व भारती विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना सहभागी झाल्या होत्या. मोदी म्हणाले, रवींद्रनाथ टागोरांचे विचार आजच्या काळातही तेवढेच महत्त्वाचे आहेत. शांती निकेतन येथील हेलिपडॅटवर         पंतप्रधानांचे स्वागत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी केले. यावेळी हेलिपॅडकडे येणाऱ्या मार्गात चिखल साचलेला होता, त्याकडे अंगुली निर्देश करत मोदींनी ममता बॅनर्जींना दुसऱ्या बाजूने येण्यास सांगितले. दीक्षांत समारंभानंतर मोदी झारखंडला गेले. तिथे त्यांच्या हस्ते 27 हजार कोटींच्या योजनांचे भूमिपूजन होणार आहे. 

 

गुरुदेवांच्या पावनभूमीवर येण्याचे सौभाग्य लाभले 
- मोदींनी भाषणाच्या सुरुवातीलच विद्यार्थ्यांची माफी मागीतली. ते म्हणाले, मी येत असताना अनेक विद्यार्थ्यांनी इशाऱ्याने सांगितले की त्यांना पिण्याचे पाणीही नाही. त्यासाठी मी माफी मागतो. विश्व भारती विद्यापीठाचा चान्सलर असूनही मला येथे येण्यास एवढा उशिर झाला, त्यासाठी मी आपली माफी मागतो.
- मोदी म्हणाले, आज येथे येऊन एवढ्या शिक्षकांसोबत बसण्याचे सौभाग्य मला मिळाले आहे. रविंद्रनाथांचे चरणस्पर्षाने पावन झालेली ही भुमी आहे. 

 

मोदी म्हणाले- गुरुदेव रविंद्रनाथांचे विचार आजही उपयुक्त 
- मोदी म्हणाले, - गुरुदेवांच्या विचारावर विश्व भारती विद्यापीठ उभे आहे. गुरुदेवांची इच्छा होती की हे विद्यापीठ एका घरासारखे असले पाहिजे. जगभरातून लोक येथे येतील आणि येथे राहातील. हे भारताचे वैशिष्ट्य आहे. त्यासाठी गुरुदेवांनी आपले जीवन समर्पित केले होते. 21व्या शतकातही त्यांचे विचार उपयुक्त ठरणार आहेत. 
- आज या कार्यक्रमाला बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना उपस्थित आहेत. एखाद्या विद्यापीठाच्या दीक्षांत समारोहात दोन देशांचे पंतप्रधान उपस्थित राहाण्याची ही पहिलीच वेळ असेल. बांगलादेश आपला शेजारी देश आहे. त्यांचा भारताकडे सर्वाधिक ओढा आहे. येथे तयार झालेले बांगलेदश भवन, दोन्ही देशांना जोडणारे आहे. बांगलादेशातील प्रत्यक व्यक्ती स्वतःला टागोरांसोबत जोडून घेण्याचा प्रयत्न करत असते. 

 

25 कोटींचे बांगलादेश भवन 
- बांगलादेश सरकराने शांती निकेतनमध्ये बांगलादेश भवन तयार केले आहे. जवळपास 25 कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेले हे भवन एक वस्तूसंग्रहालय म्हणून तयार करण्यात आले आहे. येथे रविंद्रनाथ टागोर आणि त्यांच्या बांगलादेशाशी संबंधीत आठवणी जपून ठेवण्यात आल्या आहेत. त्यासोबतच येथे भारत आणि पश्चिमी पाकिस्तान (आता बांगलादेश) यांच्याशी संबंधीत पुस्तकांचे एक भव्य ग्रंथालय आहे. 

 

37 दिवसांनंतर पुन्हा मोदी-हसीना  भेट
- नरेंद्र मोदी आणि शेख हसीना यांची 37 दिवसांतील ही दुसरी भेट आहे. याआधी उभय नेत्यांची 18 एप्रिल रोजी कॉमनवेल्थ परिषदेदरम्यान लंडनमध्ये भेट झाली होती. 
- पंतप्रधान शेख हसीना शुक्रवार आणि शनिवार दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात भारत-बांगलादेशच्या प्रमुख नेत्यांची बैठक होईल. या बैठकीत रोहिंग्या मुस्लिम आणि नदी जल वाटपावर चर्चा होण्याची शक्यता आहे. 

 

 

बातम्या आणखी आहेत...