आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • National Democratic Alliance Meeting In Patna To Project A United Face Among People

बिहारमध्ये NDAची बैठक: JDU म्हणाले- आम्हाला महत्त्व दिले जात नाही, देशभरात आघाडीची स्थिती खराब

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा - लोकसभा निवडणुकीतील जागा वाटप आणि रणनीती निश्चित करण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (एनडीए) गुरुवारी सायंकाळी महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला जनता दल संयुक्तचे (जेडीयू) नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, भाजप नेते सुशील मोदी, लोकजन शक्ती पक्षाचे प्रमुख रामविलास पासवान आणि राष्ट्रीय लोकजन समाज पक्षाचे उपेंद्र कुशवाह उपस्थित राहाणार आहेत दुसरीकडे, जेडीयूचे राष्ट्रीय महासचिव के.सी. त्यागी म्हणाले, एनडीएची बिहारच नाही तर देशातील स्थिती वाईट आहे. बिहारमधील सत्तेत भागीदार असलेल्या जेडीयूला त्रास दिला जात आहे. विशेष म्हणजे, भाजप अध्यक्ष अमित शहा बुधवारी मुंबई दौऱ्यावर होते. त्यांनी एनडीएतील सर्वात महत्त्वाचा सहकारी पक्ष शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. मात्र या भेटीत काय झाले हे अजून गुलदस्त्यात आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती होणार की नाही याचा निर्णय अद्याप झालेला नाही. 

 

भाजपने नितीशकुमारांच्या प्रतिमेचा सदुपयोग केला पाहिजे 
- त्यागी म्हणाले, जेडीयूला ना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाले ना एनडीएच्या रणनीती आणि धोरण निश्चितीमध्ये महत्त्व  दिले जाते. भाजपने नितीशकुमार यांच्या प्रतिमेचा सदुपयोग करुन घेतला पाहिजे. 2014 प्रमाणे यंदा लाट नसेल तर एनडीएची केंद्रात पुन्हा सत्ता येणे अवघड आहे. 
- लोकजन शक्ती पक्षाचे नेते पशुपती पारस म्हणाले, 'आम्ही 6 जागांवर विजयी झालो आहे, त्या जागांसोबत आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही. एनडीएमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. आघाडीतील सर्व घटक पक्षांना खूश ठेवणे ही त्यांची जबाबदारी आहे.'
- काही दिवसांपूर्वी जेडीयू खासदार पवन वर्मा म्हणाले होते, निवडणूक लोकसभेची असेल नाही तर राज्यसभेची. बिहारमध्ये आघाडीचा चेहरा नितीशकुमारच असतील. 

 

बिहारमध्ये लोकसभेच्या जागा 40 
जेडीयू - 25 
लोकजन शक्ती पक्ष - 7 
राष्ट्रीय लोकजन समाज पार्टी - 4 
सहकारी पक्षांची मागणी पूर्ण केल्यानंतर 
भाजप - 4 

 

बिहारमध्ये सध्या कोणत्या पक्षाचे किती खासदार 
भाजप - 23 
लोजपा- 06 
रालोसपा - 3 
जेडीयू - 2 

 

जोकिहाटमधील पराभवानंतर...
- नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीनंतर एनडीए आघाडीविरोधात सूर निघू लागले आहेत. सर्वात आधी रालोसपाचे प्रमुख उपेंद्र कुशवाह यांनी म्हटले होते, की एनडीएमध्ये सर्वकाही आलबेल नाही. 
- एनडीच्या घटक पक्षांमध्ये अस्वस्थता आहे. त्यांची आपण वेगळे पडलो असल्याची भावना आहे. कुशवाह म्हणाले, निवडणुकीपूर्वीच जागा वाटपाची चर्चा होऊन स्थिती स्पष्ट झाली पाहिजे. 
- दुसरीकडे, जेडीयूने म्हटले होते, की बिहारमध्ये एनडीए आघाडीत 'बिग ब्रदर' जेडीयू आहे.  मग निवडणूक लोकसभेची असेल नाही तर विधानसभेची. 
- आता लोकजन शक्ती पक्षानेही आपणही मागे नसल्याचे दाखवून दिले आहे. लोजपाचे नेते चिराग पासवान काही दिवसांपूर्वी म्हणाले होते, की एनडीएचा चेहरा पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. गुरुवारी होणाऱ्या बैठकीत निवडणुकीची रणनीती निश्चित होईल आणि जागा वाटपावर चर्चा होणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...