आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवसा ढाब्यावर काम, रात्री टाटा मॅजिकमध्ये सेक्स रॅकेट, अशा अवस्थेत पकडले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालंधर - पंजाब पोलिसांनी टाटा मॅजिक कारमध्ये चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा भांडाभोड केला आहे. या प्रकरणात 4 जणांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये नेपाळची 35 वर्षीय महिला, 2 ग्राहक टिंकू आणि अनोखे लाल असे आहेत. तर ड्रायव्हर चेतन या सेक्स रॅकेटचा मास्टरमाइंड आहे. या चौघांना कोर्टात सादर केले असता सर्वांची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.


अशा अवस्थे सापडले...
- पोलिस अधिकारी बिमल कांत यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते आपल्या समूहासह नाइट ड्युटीवर शहरात गस्त घालत होते. त्याचवेळी एका कारमध्ये सेक्स रॅकेट चालत असल्याची गुप्त माहिती त्यांना मिळाली. त्याच माहितीच्या आधारे त्यांनी वाहनात धाड टाकली. 
- पोलिसांनी गाडीचे दार उघडले तेव्हा नेपाळी महिला आपल्या ग्राहकासोबत आक्षेपार्ह अवस्थेत सापडली. कारमध्ये एक ग्राहक टिंकू आणि महिला होते. तर कारच्या बाहेर दुसरा ग्राहक अनोखे लाल आणि ड्रायव्हर चेतन उभे होते. हे दोघे बाहेरून येणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवून होते. 
- त्या चौघांनाही अटक करून कसून चौकशी करण्यात आली. त्यावेळी अटकेत असलेली महिला दिवसा एका ढाब्यावर काम करते असे समोर आले आहे. ड्रायव्हर चेतन तिला रात्र होताच आपल्या गाडीत बसवून देहविक्रयासाठी घेऊन जात होता. 
- ग्राहकाचा फोन कॉल आल्यानंतर एक जागा निश्चित व्हायची. त्याच ठिकाणी ड्रायव्हर आपल्या वाहनात त्या महिलेला घेऊन जायचा. यातून होणारी कमाई चेतन आणि ती महिला वाटून घेत होते.

 

बातम्या आणखी आहेत...