आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लव मॅरेजचा असाही अंत, लग्नाचा पहिला वाढदिवस देखील साजरा नाही करू शकली विवाहिता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आरा (बिहार)- येथे राहणाऱ्या 22 वर्षाच्या मुस्कान सिंहचे गेल्या जूनमध्ये लव मॅरेज झाले होते. दोघांच्या कुटुंबीयांच्या सहमतीने लग्न झाले होते. रविवारी रात्री स्टेशनजवळ संशयास्पद अवस्थेत ट्रेनखाली तिचा मृत्यू झाला. सोमवारी सकाळी डाऊन रेल्वे ट्रॅकवरून नवविवाहितेचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. सुरूवातीच्या तपासात विवाहितेच्या मृत्यूचे कारण आत्महत्या असल्याचे सांगण्यात येत आहे. 


जून 2017 मध्ये झाले होते लव मॅरेज...
- मृत मुस्कान उर्फ सृष्टीचे 10 जून 2017 रोजी सूरज सिंह याच्याशी लग्न झाले होते.
- लग्नानंतर मुस्कान आपल्या माहेरशेजारी बनलेल्या कॉलनीत राहत होती. सोबत एक छोटा भाऊ रीतेश देखील राहत होता.
- सध्या रेल्वे पोलिस प्रकरणाचा तपास करत आहेत. माहेरच्या लोकांची देखील विचारपूस करण्यात येत आहे.


शनिवारी संध्याकाळी गायब झाली मुस्कान...
- कौटुंबीक मतभेदामुळे दोघांमध्ये वाद झाला होता असे सांगण्यात येत आहे. यानंतर नवविवाहिता मुस्कान अचानक गायब झाली होती.
- भाऊ रितेशने सांगितले की कुटुंबात काही मतभेद झाले होते. परंतु, दुसरीकडे सासच्यांनी पोलिसांना ट्रेन मधून पडून तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे.
- पोलिस या प्रकरणी आधिक तपास करत आहेत.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...