आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॅलेंटाइनलाच झाला लव्ह मॅरेजचा असा अंत, हातावरच लिहिले मृत्यूचे हे कारण...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंचकुला/ कालका - व्हॅलेंटाइन डेच्या एक दिवसआधीच कालकामध्ये एका लव्ह स्टोरीचा दु:खद अंत झाला. कालकाच्या रेल्वे कॉलनीत राहणाऱ्या कौशल्या (32) ने लव्ह मॅरेजच्या 27 महिन्यांनंतर घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. कौशल्या 3 महिन्यांची प्रेग्नंट होती. कौशल्याने मृत्यूआधी आपल्या डाव्या हातावर पेनने सुसाइड नोटही लिहिली आहे.

 

हातावर हे होते लिहिलेले...
‘माझ्या एका चुकीच्या निर्णयामुळे मी या टोकापर्यंत आले आहे. मी आईवडिलांचे ऐकले असते तर.... धन्यवाद देवा! माझ्या पतीनेही माझी साथ दिली असती तर...’

 

जॉब करत होती मृत कौशल्या 
- मृत कौशल्याचा पती प्रमोद कुमार इलेक्ट्रिशियन व प्लम्बरचे काम करतो.
- नोव्हेंबर 2016 मध्ये त्याचे व कौशल्याचे लव्ह मॅरेज झाले होते.
- कौशल्या येथे एका खासगी कंपनीत जॉब करत होती. ती हिमाचलच्या मंडी जिल्ह्यातील एका गावातील रहिवासी होती. 
- प्रमोद म्हणाला की, तो रात्री घरी आला तेव्हा त्याला कौशल्याने फाशी घेतल्याचे दिसले.
- कौशल्याला लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो, पण तेथे डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.

 

दोन महिन्यांपूर्वीच जावयाने मुलीला परत नेले होते: वडील

- कौशल्याचे वडील परमानंद पोलिसांना म्हणाले की, लग्नाच्या काही दिवसांनी माझ्या मुलीला जावई प्रमोद आणि त्याची आईबहीण त्रास देऊ लागले होते. ते तिचा सतत छळ करत होते.
- छळामुळे त्रस्त होऊन कौशल्या परत माहेरात येऊन राहू लागली होती. पण मागच्या दोन महिन्यांपूर्वीच प्रमोदने तिची समजूत घालून तिला परत नेले होते.
- वडिलांच्या जबाबाच्या आधारे कौशल्याची सासू आणि तिची नणंद चारूविरुद्ध आत्महत्येसाठी प्रेरित केल्याचा आणि छळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या प्रकरणाचे आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...