आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

923 काेटींच्या दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडणाऱ्या पोलिस शिपायाची कथा...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर- सीताराम २८ जानेवारीला ड्यूटीवर हाेते. त्यांची नियुक्ती अॅक्सिस बँकेत करण्यात अाली अाहे. त्या दिवशी डी.अाे. सुरेंद्र सिंह यांनी कार्यालयीन पाहणीदरम्यान त्यांना रायफल दाखवण्यास सांगितले; परंतु सीताराम हे रायफलला विशिष्ट पद्धतीने दाखवू शकले नाहीत. त्यामुळे सिंह यांनी त्यांना फटकारले. या घटनेमुळे सीताराम खूप दु:खी झाले; परंतु अाजपासून नेहमी सतर्क राहीन, असा निश्चय त्यांनी केला. या घटनेनंतर १० दिवसांनी बँकेवर दराेडा टाकण्यासाठी अालेल्या दराेडेखाेरांवर खिडकीतून गाेळीबार करून त्यांचा बँकलुटीचा प्रयत्न हाणून पाडण्यास सुरेंद्र सिंह यांचे फटकारणेच कारणीभूत ठरले, असे सीताराम यांनी सांगितले.   


गत मंगळवारी देशातील सर्वात माेठा ९२६ काेटींचा बंॅक दराेड्याचा प्रयत्न अयशस्वी करणाऱ्या सीताराम यांना गॅलंट्री प्रमाेशन देण्याची शिफारस करण्यात अाली अाहे. त्या दिवशी सी-स्कीम भागातील बंॅकेच्या बाहेरील दरवाजावर खासगी सुरक्षारक्षक प्रमाेदकुमार तैनात हाेता. रात्रीचे अडीच वाजले हाेते. एका इनाेव्हा कारमधून १३ जण बंॅकेजवळ अाले. दाेघे गाडीतच बसून राहिले, तर पाच-सहा जण ताेंडावर रुमाल बांधून बाहेरच्या भिंतीवरून उड्या मारून अात अाले.

 

त्यातील दाेघांकडे पिस्तूल हाेते. दाेघे प्रमाेदवर हल्ला करून त्याचे हात-पाय बांधू लागले, तर इतरांनी बंॅकेचे चॅनल गेट उघडले. बंॅकेबाहेर सुरू असलेला गाेंधळ एेकून तिजाेरीच्या सुरक्षेची जबाबदारी असलेले सीताराम यांनी तत्काळ परिस्थितीचा अंदाज घेत गाेळीबार केला. पुन्हा गाेळीबार करणार ताेच बँकलुटीसाठी अालेले पळून जाऊ लागले. ते सर्व जण दराेड्याचे पूर्ण नियाेजन करून अाले हाेते. मात्र, त्यांचा बँकलुटीचा प्रयत्न सीताराम यांनी हाणून पाडला. या कारनाम्यामुळे पाेलिस विभागात हीराे बनलेल्या सीताराम यांच्याशी ‘दिव्य मराठी’ने संवाद साधला. ते म्हणाले- खरंच, ते खूपच भीतिदायक क्षण हाेते; परंतु त्यामुळे खूप माेठी हिंमत मिळाली व ती मला पुढे कामी येणार अाहे. मात्र, या नाेकरीपर्यंत पाेहाेचणे माझ्यासाठी साेपे नव्हते. अाई-वडील अशिक्षित अाहेत. त्यामुळे मजुरी करत असत. मी त्यांचा एकुलता मुलगा अाहे. मजुरी व शेतीकामात वडिलांना मदत करून पुस्तके विकत घेतली. बी.एड. करून शिक्षक बनण्याची इच्छा हाेती; परंतु हवालदार भरतीत निवड झाल्याने या नवीनच मार्गावर येऊन पाेहाेचलाे.


सीताराम हे मूळचे सीकर जिल्ह्यातील पुनियाना गावातील रहिवासी अाहेत. सीनियर सेकंडरीपर्यंतचे शिक्षण दांतारामगड येथून, तर महाविद्यालयीन शिक्षण रेनवालमधून केले. बारावीत ते त्यांच्या वर्गात टाॅपर हाेते. दीड वर्षापूर्वीच त्यांचे लग्न झाले. बंॅकलुटीच्या घटनेबाबत घरी माहीत झाल्यावर वडील टाेडाराम यांनी जीवनात पहिल्यांदाच शाबासकी दिली. म्हणाले- ‘बेटा, तू अामचे नाव उज्ज्वल केलेस. 


अाज सर्वांच्या अाेठांवर तुझे नाव अाहे.’ अाई प्रेमबाई यांनाही मुलाचा अभिमान वाटताेय. तथापि, या घटनेने ती काहीशी घाबरूनही गेली. त्यामुळे मुलगा सीतारामला सांभाळून राहण्यास सांगत असते, तर पत्नीला अापला पती अशाच हिमतीने यापुढेही असेच काम करत राहण्याची अपेक्षा अाहे. शिक्षक बनणे, हे अाजही गावात माेठे स्वप्न मानले जाते. तसेच मी शिक्षक व्हावे, अशी अाई-वडिलांचीदेखील इच्छा हाेती. बी.एड. करत असतानाच शिक्षक बनण्याची तयारी सुरू केली हाेती. मात्र, हवालदार भरतीत निवड झाली. २०१५ मध्ये नाेकरीत रुजू झालाे. प्रशिक्षणानंतर बंॅकेच्या येथील शाखेत सुरक्षारक्षक म्हणून नियुक्ती मिळाली, असेही सीताराम यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...