आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षा लालूंना झालीय, टीका माझ्यावर होत आहे: बिहारचे मुख्‍यमंत्री नितीशकुमार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा- मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राजद अध्यक्ष लालू प्रसाद यांच्यावर बोलताना म्हटले, शिक्षा त्यांना होते आहे, विनाकारण टीकेचा धनी मला केले जात आहे. माध्यमातून येणाऱ्या विविध आरोपावर त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. २० वर्षे जुन्या प्रकरणात लालूंना शिक्षा होते आहे. यात माझी अथवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोणतीही भूमिका नव्हती, लोकसंवाद कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ज्या प्रकरणात शिक्षा होते आहे, त्यात जनहित याचिका  तर सुशील मोदी,राजीव रंजन आणि ललनसिंह व सरयू राय यांनी दाखल केली होती. न्यायालयाच्या आदेशावरून सीबीआयने तपास केला. न्यायालयात प्रकरण सुरू आहेत. मी  न्यायालयाच्या निर्णयावर काही प्रतिक्रिया देत नसतो.


महाआघाडी करताना म्हटले होते, सरकार दीड वर्ष टिकेल

मुख्यमंत्री नितीशकुमार म्हणाले, सर्व काही सहन करण्यास तयार आहे. पण भ्रष्टाचार व सुशासनाच्या मुद्यावर तडजोड करणे कदापि शक्य नाही. 


मी तर २० महिने सरकार चालवले.  एनडीएमध्ये वाद होत असल्याच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले, सरकारचा मी प्रमुख आहे, एनडीएचा नाही. तसे पाहू जाता,  प्रत्येक पक्ष आपल्या परीने आपली बाजू मांडत असतो, असे नितीशकुमार यांनी स्पष्ट केेले.पोटनिवडणुका लढविण्याचा निर्णय नाही, असे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...