आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामुळे लष्कराचा अधिकारी नाराज; चक्क हेलिपॅडवर ठेवले ड्रम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डेहराडूनच्या जीटीसी हेलिपॅडवर ठेवलेले दाेन ड्रम (लाल वर्तुळात). त्यामुळे हेलिपॅडवरच दुसऱ्या जागी उतरलेले मुख्यमंत्री रावत यांचे हेलिकाॅप्टर. - Divya Marathi
डेहराडूनच्या जीटीसी हेलिपॅडवर ठेवलेले दाेन ड्रम (लाल वर्तुळात). त्यामुळे हेलिपॅडवरच दुसऱ्या जागी उतरलेले मुख्यमंत्री रावत यांचे हेलिकाॅप्टर.

डेहराडून- उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांचे हेलिकाॅप्टर लँड हाेऊ नये म्हणून सैन्य दलाचे जनरल अाॅफिसर-कमांडिंग यांनी चक्क हेलिपॅडवरच दाेन ड्रम ठेवून अापली नाराजी व्यक्त केली. त्यामुळे चालकाला दुसऱ्या जागी हेलिकाॅप्टर उतरवावे लागले. हा प्रकार साेमवारी घडला.


मुख्यमंत्री रावत यांना हेलिकाॅप्टरमधून उत्तरकाशी जिल्ह्यातील सांवणी या गावी जायचे हाेते. तेथे जाऊन ते अग्निकांडातील पीडितांची विचारपूस करून नुकसानग्रस्त कुटुंबांना अार्थिक मदत देणार हाेते. रावत यांचे हेलिकाॅप्टर डेहराडूनमधील कॅन्ट येथील जीटीसी हेलिपॅडवरून रवाना हाेऊन उत्तरकाशीत जखाेलमधील तात्पुरत्या हेलिपॅडवर उतरणार हाेते. 


याबाबत मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले की, दुपारी सव्वादाेन वाजता मुख्यमंत्र्यांचा ताफा जीटीसी हेलिपॅडकडे जात असताना जीअाेसी सबएरिया-डेहराडूनचे मेजर जनरल जे.एस.यादव यांनी अापले खासगी वाहन ताफ्याच्या मार्गात अाणून उभे केले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा ताफा येत असल्याने तुमचे वाहन एका बाजूला घ्या, असे सीअाे सिटी व कॅन्टच्या ठाणेदाराने सांगितले. त्यावर संतप्त हाेऊन जीअाेसी यादव यांनी वाहन हटवण्यास नकार दिला. तसेच हा अामचा परिसर अाहे व या ठिकाणी अामच्या मर्जीनेच लाेक येऊ-जाऊ शकतील. त्याचप्रमाणे पाेलिस येथून पुढे जाऊ शकणार नाहीत. ते अापल्या वाहनांसह बाहेरच थांबतील, असेही धमकावले. पि, त्यानंतर यादव यांनी मुख्यमंत्र्यांच्या वाहनाला जाण्याची परवानगी दिल्याने रावत रवाना झाले.


रावत हे तेथून दुपारी साडेतीन वाजता परतले. त्यांचे हेलिकाॅप्टर जीटीसीवर बनलेल्या हेलिपॅडवर उतरणार हाेते; परंतु त्याच वेळी काही जवानांनी हेलिकाॅप्टरचे लॅण्डिंग हाेऊ नये म्हणून हेलिपॅडवर दाेन ड्रम अाणून ठेवले. चालकाने हेलिकाॅप्टर उतरवण्यासाठी खाली पाहिले असता, त्याला हेलिपॅडवर दाेन ड्रम ठेवलेले दिसले. त्यामुळे त्याला हेलिकाॅप्टर दुसऱ्या जागी उतरवावे लागले. दरम्यान, या प्रकाराबाबत रावत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मुख्य सुरक्षा अधिकाऱ्याने याप्रकरणी कॅन्ट पाेलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावर या प्रकरणाला जसा रंग देण्यात येत अाहे, वास्तवात ते तसे नाही. पाेलिसांना याबाबत पूर्ण माहिती अाहे, असे मेजर जनरल यादव यांचे म्हणणे अाहे.  

बातम्या आणखी आहेत...