आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

53 डेराप्रेमींवरील देशद्रोहाचे कलम काढले; चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकास मोठा झटका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंचकुला- पंचकुला येथे डेरा सच्चाच्या अनुयायांनी दंगल घडवून आणल्याच्या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकास मोठा झटका बसला आहे. दंगलीतील ५३ आरोपींवरील देशद्रोहाचे कलम हटवण्यात आले आहे. यात बहुतांश लोक डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहिम याचे निकटवर्तीय आहेत. अथवा डेरा व्यवस्थापन समितीचे सदस्य आहेत.  


पंजाब अँड हरियाणा उच्च न्यायालय डेरा दंगलीवर देखरेख करत होते, तोवर हरियाणा पोलिसांचा तपास व्यवस्थित सुरू होता. आता वेगळीच खेळी खेळली जात असल्याचे बोलले जाते. याच पद्धतीने डेराची चेअरपर्सन विपासना याआधी सिरसा पोलिसात हजर झाली होती, पण पंचकुला पोलिस तिला अटक करण्यासाठी गेले होते, तेव्हा ती बेपत्ता होती. नियमाप्रमाणे देशद्रोहाचा आरोप ठेवायचा असल्यास केंद्र वा राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागते. मात्र, आरोपपत्र दाखल करण्यापूर्वी  पंचकुला पोलिसांनी मंजुरी घेतली नव्हती.

बातम्या आणखी आहेत...