आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरात निवडणूक: मंत्री रूपाला यांना पळता भुई थाेडी, ताट-लाटणे घेऊन 200 महिलांचा पाठलाग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विसनगर- गुजरातच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रचाराने वेग घेतला अाहे. उत्तर गुजरातमधील पाटीदारांनी अापल्या क्षेत्रात भाजप नेत्यांना प्रवेश न देण्याचा निर्धार केला अाहे. १५ मतदारसंघांत येणाऱ्या भाजपच्या सर्वच नेत्यांना पळवून लावण्यासाठी रॅली काढली. यादरम्यान पाटीदार नेते परसाेत्तम रूपाला यांना पळता भुई थाेडी झाली. दरम्यान दगडफेकदेखील झाली. अाज महेसाणा अाणि विसनगरमधून भाजपच्या पाटीदार नेत्यांना पळवून लावण्यासाठी रॅली काढली गेली त्यात माेठ्या संख्येने महिला सामील झाल्या हाेत्या. हातात लाटणे-ताट घेऊन निघालेल्या महिलांचा संताप पाहण्यासारखा हाेता. त्यामुळे मंत्री रूपाला यांना तेथून पळ काढणे अपरिहार्य ठरले. कारण साऱ्या महिला त्यांच्या मागे धावत निघाल्या हाेत्या. या वेळी दगडफेक झाली.

बातम्या आणखी आहेत...