आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2014 नंतर 18 राज्यांत निवडणुका, त्यापैकी 13 मध्ये पाकचा उल्लेख ठरला प्रचाराचा मुद्दा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद- गुजरात विधानसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आहे. तेथे रोज नवे मुद्दे आणि वाद उपस्थित होत आहेत. रविवारी पाकिस्तानही निवडणूक मुद्दा झाला. त्यानंतर देशाच्या राजकारणात वक्तव्यांची मालिका सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पालनपूरच्या निवडणुकीत म्हटले होते की, पाकिस्तानी लष्कराचे माजी महासंचालक सरदार अर्शद रफिक हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांना गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाच्या रूपात पाहू इच्छितात. त्यानंतर काँग्रेस आणि भाजपमध्ये शाब्दिक युद्ध सुरू आहे. आता त्यात पाकिस्तानही सहभागी झाला आहे. 

 

पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते डॉ. मोहंमद फैजल म्हणाले की, भारताने आपल्या निवडणुकीत पाकिस्तानला ओढू नये, आपल्या बळावर निवढणूक लढवावी. त्यावर भारताने ‘आम्ही आमची ताकद ओळखतो, त्यामुळे आम्हाला सल्ल्याची गरज नाही,’असे म्हटले.देशाच्या निवडणुकीत पाकिस्तानशी संबंधित विषय चर्चेचा मुद्दा ठरण्याची ही पहिली वेळ नाही. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप नेते गिरिराज सिंह यांनी झारखंडमधील सभेत म्हटले होते की, जे लोक मोदींना विरोध करतात ते पाकिस्तानकडे पाहत आहेत. अशा लोकांचे स्थान भारतात नाही, पाकिस्तानमध्ये आहे.

 

सहा राज्यांतील राजकीय पक्षांचे प्रचारात पाकिस्तानशी संबंधित सहा वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य

> गुजरात : कच्छ, २७ नाेव्हेंबर २०१७

हाफिजच्या सुटकेवर
२७ नाेव्हेंबर राेजी कच्छमध्ये माेदींनी सांगितले, पाकच्या काेर्टाने अतिरेकी हाफिज सईदला साेडले. त्याचा अानंदाेत्सव काँग्रेस साजरा करत अाहे. सर्जिकल स्ट्राइकवर मात्र काँग्रेसचा विश्वास नव्हता.
१० डिसेंबर २०१७ : पालनपूरमध्ये माेदी म्हणाले, काँग्रेस नेते पाक लष्कराच्या माजी डीजींसाेबत रणनीती अाखत अाहेत.

 

> उत्तर प्रदेश : ४ फेब्रुवारी २०१७
सर्जिकल स्ट्राइक
उत्तर प्रदेश निवडणूक प्रचारात पंतप्रधान मोदी यांनी मेरठच्या सभेत सर्जिकल स्ट्राइकचा मुद्दा काढला. ‘अामचे सरकार पाकमध्ये घुसून पै-पैचा हिशेब पूर्ण करत अाहेत,’ असे माेदी म्हणाले हाेते.
२४ फेब्रुवारी २०१७ : गाेंडाच्या सभेत मोदी यांनी कानपूर रेल्वे दुर्घटनेबाबत पाकिस्तानला जबाबदार ठरवले हाेते.

 

> पंजाब : २९ जानेवारी २०१७
पाक संधीच्या शाेधात
पंजाबमधील कोटकपुरा प्रचारसभेत पंतप्रधान मोदी म्हणाले हाेते, पाकिस्तान नेहमी संधीच्या शाेधात असताे.  ताे नेहमी पंजाबच्या भूमीचा गैरवापर करण्याच्या प्रयत्नात असताे. जर येथील सरकार कमजाेर असेल तर पाकिस्तानमुळे केवळ पंजाब राज्यालाच नव्हे तर संपूर्ण भारताला संकटांना सामाेरे जावे लागेल.

 

> बिहार : २९ अाॅक्टाेबर २०१५
...तर पाक फटाके फाेडेल
भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी बिहारच्या प्रचारात पाकचा मुद्दा काढला. रक्सौलच्या सभेत ते म्हणाले- ‘चुकीने जरी बिहारमध्ये भाजप हरला तर जय-पराजय इथे हाेईल, मात्र पाकमध्ये फटाके फाेडले जातील.’
- राजीव प्रताप रुडी यांनी पाकमधील ‘डॉन’ वेबसाइटचा स्क्रीनशॉट व मतदानाचे अावाहन करणारी नितीश यांची जाहिरात टि‌्वट केली.

 

> जम्मू-काश्मीर, जानेवारी २०१४
केजरी पाकचे एजंट
दिल्ली व जम्मू-काश्मीरच्या निवडणुका काही महिन्यांतच झाल्या. मोदी कठुअाच्या सभेत म्हणाले, हे तीन ए.के. पाकच्या तीन शक्ती म्हणून समाेर येत अाहेत. पहिली एके ४७. दुसरे ए.के. अॅन्टाेनी व तिसरे ए.के. ४९ ज्यांनी नव्या पक्षाची स्थापना केली. या पक्षाच्या वेबसाइटवर काश्मीरला चक्क पाकिस्तानमध्ये दाखवलेय.

 

>महाराष्ट्र : ९ अाॅक्टाेबर २०१४
शत्रूला चाेख प्रत्युत्तर
महाराष्ट्राच्या निवडणूक प्रचारात बारामती येथील सभेत माेदी म्हणाले हाेते, अाज जेव्हा सीमेवर गाेळ्या बरसत अाहेत, तेव्हा शत्रू घाबरून पळत अाहे. अामचे जवान अाक्रमकपणे त्यांना प्रत्त्युत्तर देत अाहेत. शत्रूलाही समजले अाहे की अाता वेळ बदलली अाहे. जुन्या सवयी सहन हाेणार नाहीत. लाेकांना माझे हेतू माहिती अाहेत.

 

काँग्रेस मागे नाही
> पाक करतोय गोळीबार
महाराष्ट्र : १० आॅक्टोबर २०१४
महाराष्ट्राच्या निवडणुकीत राहुल गांधी दिंडोरीच्या सभेत म्हणाले-आपण भारताला मजबूत करू, पाकला धडा शिकवू, असे मोदी लोकसभा निवडणुकीत म्हणाले होते. पाक आपल्या सैनिकांवर गोळीबार करत आहे.


> गुजरात : २५ नोव्हेंबर २०१७
राहुल गांधींनी हाफिझ सईदच्या सुटकेबद्दल ट्विटरवर लिहिले-नरेंद्रभाई, काही उपयोग  झाला नाही, दहशतवादाचा मास्टरमाइंड मुक्त आहे. गळाभेटीचे धोरण उपयोगी पडले नाही.

> आसाम : २०१६
माजी पंतप्रधान मनमोहन सिंह आसाममधील सभेत म्हणाले-पाकबाबत मोदींचे धोरण गुळमुळीत आहे.

 

का होत आहे?- गुजरातमध्ये ९०% हिंदू मतदार महत्त्वाचे आहेत

गुजरातमध्ये सुमारे ९०% हिंदू मतदार आहेत. भाजप २२ वर्षांपासून सत्तेत आहे. गुजरातला भाजपची हिंदुत्वाची प्रयोगशाळा मानले जाते. नरेंद्र मोदींच्या हिंदुत्ववादी प्रतिमेमुळे भाजपची देशभर वाढ झाली आहे. राम मंदिर आंदोलनाचे नेते आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी गुजरातचेच आहेत. काँग्रेस यंदा येथे जातीय राजकारणाचे कार्ड खेळत आहे. तज्ज्ञांच्या मते, त्यामुळेच भाजपने हिंदुत्वाचे कार्ड खेळले आहे.

 

 

या राज्यांतही पाकवर झाले राजकारण

दिल्ली, अासाम, झारखंड, पश्चिम बंगाल, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचलमध्ये पाकिस्तानवर राजकारण झाले आहे. हिमाचल आणि गुजरातचा निकाल यायचा आहे. भाजपला १३ पैकी ७ राज्यांत फायदा, ४ राज्यांत नुकसान झाले आहे. काँग्रेसला पंजाबमध्ये फायदा झाला आहे.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, मोदी अमित शहांना घाबरतात- राहूल गांधी​

बातम्या आणखी आहेत...