आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातचे माजी पोलिस महासंचालक पांडे निर्दोष; इशरत जहां चकमक प्रकरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद- सीबीआयच्या विशेष न्यायालयाने इशरत जहां आणि इतर तीन जणांच्या कथित बनावट चकमक प्रकरणात गुजरातचे माजी प्रभारी पोलिस महासंचालक पी. पी. पांडे यांना बुधवारी आरोपमुक्त केले.  न्यायाधीश जे. के. पंड्या   म्हणाले की, इशरत जहां आणि इतरांचे अपहरण तसेच हत्या प्रकरणात पांडे यांच्याविरुद्ध पुरावा नाही.   


मुंब्रा येथील १९ वर्षीय विद्यार्थिनी इशरत जहां आणि तिचा मित्र जावेद शेख ऊर्फ प्रणेश तसेच दोन पाकिस्तानी नागरिकांना गुजरात पोलिसांनी १५ जून २००४ रोजी अहमदाबादच्या बाहेरील भागात कथित चकमकीत ठार केले होते. हे सर्वजण लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी होते आणि ते तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट आखत होते, असा पोलिसांचा दावा होता. नंतर सीबीआयने ही बनावट चकमक असल्याचे म्हटले होते आणि २०१३ मध्ये  पांडे, पोलिस महासंचालक वंजारा यांच्यावर कट रचल्याचे अाराेप ठेवण्यात अाले हाेते.

बातम्या आणखी आहेत...