आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भक्तिमय वातावरणात जगन्‍नाथ रथयात्रेस सुरूवात, पुरीसाठी 120 विशेष रेल्वे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुरी - ओडिशा, गुजरात, झारखंड, पश्चिम बंगाल, आदी राज्यांत जगन्नाथांची रथयात्रा भक्तिमय वातावरणात जल्लोषात काढण्यात आली. देशभरात हा उत्सव साजरा केला जातो.
प्रमुख स्थान असलेल्या ओडिशातील पुरी येथे नऊ दिवस चालणाऱ्या भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेस शनिवारपासून सुरुवात झाली. जगन्नाथ मंदिरापासून तीन किमी दूर असलेल्या गुंडिचा मंदिरापर्यंतच्या यात्रेत हजारो भाविक सहभागी झाले होतेे.

 

तत्पूर्वी भगवान जगन्नाथ १६ चाकांच्या “नंदीघोष’ रथात, त्यांचे बंधू बलराम १४ चाकांच्या “तलध्वज’व देवी सुभद्रा १२ चाकांच्या “देवदलान’ रथात रीतसर पूजाअर्चा झाल्यानंतर स्वार झाले. तिन्ही देवांना मंदिराच्या गर्भगृहाच्या “रत्नवेदी’तून बाहेर काढण्यात आल्यानंतर वैदिक पद्धतीने सर्वप्रथम “गोपाल भोग’ देण्यात आला. परंपरेनुसार, सर्वप्रथम भगवान बलराम, नंतर सुभद्रा व शेवटी भगवान जगन्नाथांनी रथयात्रा सुरू केली. गुंडिचा मंदिर भगवान जगन्नाथांच्या मावशीचे घर आहे. तेथे नऊ दिवसांच्या प्रवासानंतर ते परत येतील, असे मानले जाते. 

 

छत्तीसगडमध्येही रथयात्रेत भाविकांचा उत्साह

छत्तीसगडमध्येही भगवान जगन्नाथांची रथयात्रा धार्मिक श्रद्धा, उत्साह व जयघोषात काढण्यात आली. या रथयात्रेत भाविक मोठ्या संख्येनेे सहभागी झाले होते. राजधानीतील गायत्रीनगरात असलेल्या जगन्नाथ मंदिराच्या रथयात्रा महोत्सवात मुख्यमंत्री रमणसिंह सहभागी झाले होते. त्यांच्या हस्ते भगवान जगन्नाथ, बलराम व सुभद्रा यांची पूजाअर्चा करण्यात आली. त्यांनी राज्यांसाठी सुख-समृद्धी व शांतता कायम राहावी, म्हणून प्रार्थना केली. डाॅ. रमणसिंह यांनी जगन्नाथ रथाचा मार्ग सोन्याच्या झाडूने स्वच्छ केला. त्यानंतर मंदिराच्या यज्ञास उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...