आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीर खोऱ्यामध्ये भरकटलेले युवक खेळांमुळे सन्मार्गावर, 60 हजार मुले स्पर्धांत सहभागी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर - काश्मीरमध्ये भरकटलेल्या युवकांना प्रोत्साहन म्हणून सरकारने खेळाचा आधार घेतला आहे. त्यांना बंदूक, दगड किंवा ड्रग्जपासून परावृत्त करू पाहत आहे. याबाबतचा अहवाल मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी गृहमंत्री राजनाथसिंह यांना सोपवला. राज्यातील पहिल्या क्रीडा परिषदेत सहभागी होण्यासाठी राजनाथ काश्मीर दौऱ्यावर होते. गेल्या एक वर्षात राज्यातील ६० हजार मुले वेगवेगळ्या स्पर्धांत सहभागी झाली.

 

यात १२ हजार मुलींचा समावेश आहे. येथे क्रीडा क्षेत्रात जिद्द निर्माण झाली आहे. दगडफेकीसाठी बदनाम श्रीनगरच्या डाऊनटाऊनमध्ये ६ पोलिस ठाणी आहेत, मात्र खेळाची मैदाने आहेत आठ. राज्य क्रीडा परिषदेचे सचिव वाहिद पारा यांनी सांगितले, २०१७ मध्ये राज्यातील १९ युवक आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळले व ८ पदके जिंकली. २००० मुलांनी राष्ट्रीय स्पर्धांत सहभाग घेतला आणि ८७ सुवर्ण, ७७ रौप्य, ११७ कांस्यपदके जिंकली. 

 

- बीसीसीआयच्या प्रशिक्षकांनी ५० वर शिबिरे घेतली आहेत. प्रत्येक जिल्ह्यात फुटबॉल अकादमी असून फुटबॉलची आतापर्यंत ४० प्रशिक्षण शिबिरे झाली.
- आइस हॉकी, स्नो स्कीइंग आणि नॉर्डिक स्कीइंगसाठी काश्मीर प्रसिद्ध आहे. देशात तीन राज्यांतच हे खेळ खेळले जातात. यात एक काश्मीर आहे. यासाठी देशातील सर्वात दर्जेदार सुविधा श्रीनगरमध्ये आहे. 
- बर्फवृष्टीतही सतत खेळ सुरू असतात. यासाठी २२ इनडोअर क्रीडा संकुले उभारली जात आहेत.

 

> 3 कथा : ज्यांनी बंदुका, दगड साेडून हाती घेतला बाॅल

 

माजिद: हुशार विद्यार्थी ते अतिरेकी...अाता प्रशिक्षक

दक्षिण काश्मीर हा दहशतवादाचा गड अाहे. तेथील अनंतनाग येथील 
रहिवासी माजिद खान मित्राच्या एन्काउंटरनंतर अतिरेकी बनला. शाळेत ‘स्टुडंट अाॅफ द इयर’चा किताब मिळवणाऱ्या माजिदच्या हाती शस्त्रे अाली. नंतर कुटुंबाच्या विनंतीवरून त्याने हा मार्ग साेडला. स्पाेर्ट‌्स काउन्सेलिंग कार्यक्रमांतर्गत
एनआयएस पतियाळात प्रशिक्षण घेतले. अाज फुटबाॅल काेच अाहे.

 

अफशा : दगड फेकणारी युवती बनली फुटबाॅलपटू

सुरक्षा रक्षकांवर दगडफेक करताना फाेटाे प्रसिद्ध झाल्यानंतर अशफा चर्चेत अाली हाेती.  अाता ती काश्मीरच्या महिला फुटबाॅल टीममध्ये कॅप्टन अाहे. ३० मुलींसह ७० मुलांना प्रशिक्षणही देते. 
ती सांगते- शिक्षण, फुटबाॅलशिवाय अन्य विषयांचा विचार करण्यासही
मला अाता वेळ मिळत नाही.

 

शबीर : डाऊनटाऊनमध्ये उघडली अकादमी

श्रीनगरचे  डाऊनटाऊन दगडफेकीस कुप्रसिद्ध अाहे. याच ठिकाणी शबीर अहमद  स्पोर्ट््स अकादमी चालवत अाहे. ताे सांगताे, मुलांना खेळात इतके मग्न करायचेय की त्यांचे लक्ष इतर चुकीच्या गाेष्टींकडे जाणारच नाही. शबीर बँकेत नाेकरी करताे. अकदमी सुरू हाेऊन वर्षही झाले नाही तरी त्याच्याकडे २५ मुली, ५० मुले प्रशिक्षण घेत अाहेत.

 

 

बातम्या आणखी आहेत...