आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी थांबवल्या ‘जय श्रीराम’च्या घोषणा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्वाल्हेर- विवाह समारंभात उपस्थित राहण्यासाठी आलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत ग्वाल्हेर रेल्वेस्थानकावर संतप्त झाले. दुपारनंतर ग्वाल्हेरला आलेले भागवत कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत स्थानकावरून बाहेर पडत असताना उपस्थित लोकांनी “जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या. यामुळे ते माघारी परतले आणि उपस्थितांना निर्देश करत म्हणाले, कोणीही घोषणाबाजी करायची नाही. जर तुम्ही घोषणा दिल्या तर मी येथूनच परत जाईन, असेही सुनावले.

 

संघप्रमुखांच्या सज्जड इशाऱ्यामुळे उपस्थितांत शांतता पसरली. त्या दरम्यान माध्यमांनी त्यांना गाठले व गुजरात निवडणुकीवरून काही प्रतिक्रिया जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा त्यांनी बोलण्यास नकार दिला. मंद स्मित करत वाहनात बसून ते निघून गेले. रेल्वेस्थानकावर त्यांच्या स्वागतासाठी मध्य प्रदेशातील उच्च शिक्षणमंत्री जयभानसिंह पवैया उपस्थित होते. त्यांनी एजी कार्यालय पुलाजवळ असलेल्या एका कार्यालयात पार पडलेल्या विवाह सोहळ्यात हजेरी लावली. वर-वधूंना अाशीर्वाद दिले. रात्री उशिरा मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी विवाह समारंभास उपस्थिती लावली. त्याचबरोबर संघ व भाजपच्या विविध संघटनांतील पदाधिकारी व अनेक महत्त्वाच्या व्यक्तींची उपस्थिती होती.  

बातम्या आणखी आहेत...