आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली/बंगळुरू- अयोध्या वादात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होताच पुन्हा एकदा कोर्टाबाहेर समझोत्याचे प्रयत्न सुरू झाले. मात्र शुक्रवारी रात्री मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने समझोत्याचे सर्व प्रस्ताव फेटाळले. मशिदीची जमीन अल्लाहची आहे. ती कुणालाही विकता वा हस्तांतरित करता येणार नाही, अशी भूमिका बोर्डाने मांडली.
तत्पूर्वी, दुपारी सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाचे सदस्य मौलाना सलमान नदवी यांनी वादग्रस्त जागा मंदिरासाठी देण्याबाबत सहमती व्यक्त केली होती. त्यांनी श्रीश्री रविशंकर यांची भेट घेतली होती.
नदवी यांनी काही अटींवर दुसऱ्या ठिकाणी मशीद उभारण्यास सहमती दर्शवली होती. तसेच त्यांनी तीन मागण्याही केल्या होत्या. त्यात वास्तू पाडणाऱ्या आरोपींना तत्काळ शिक्षा द्यावी, मशिदीसाठी वादग्रस्त वास्तूच्या दुप्पट जमीन मुस्लिमबहुल भागात द्यावी व मुस्लिमांसाठी नवीन विद्यापीठ सुरू करावे यांचा समावेश हाेता. दरम्यान, रात्री हैदराबादेत पर्सनल लॉ बोर्डाच्या बैठकीत नदवींचा प्रस्ताव फेटाळण्यात आला. एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी म्हणाले, बोर्ड अापल्या डिसेंबर १९९० आणि जानेवारी १९९३ च्या प्रस्तावावर ठाम आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.