आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दलित विद्यार्थिनीवर अत्याचार, हत्याप्रकरणी दोषीला फाशी; 28 एप्रिल 2016 रोजीची घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोची- केरळमध्ये विधी शाखेची दलित विद्यार्थिनी जिशावरील अत्याचारानंतर हत्येच्या प्रकरणात एर्नाकुलम जिल्हा न्यायालयाने दोषी मोहंमद अमिरुल इस्लाम यास फाशीची शिक्षा ठोठावली.


मूळच्या आसाममधील मोहंमदने केरळच्या पेरम्बूरमध्ये २८ एप्रिल २०१६ रोजी ३० वर्षीय जिशा हिच्यावर अत्याचार करून हत्या केली होती. न्यायालयाने मंगळवारी माेहंमदला दोषी ठरवले होते. जिशाची आई व वकिलांनी हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ असून कठोरात कठोर शिक्षा करण्याची विनंती केली होती. केरळच्या या घटनेमुळे २०१२ मधील निर्भयाच्या प्रकरणाच्या कटू स्मृती ताज्या झाल्या होत्या. 


रक्ताने माखलेले बूट महत्त्वाचा पुरावा ठरले

गुन्हेगाराने पीडितावर अत्याचार केला व तिची हत्या केली. त्याचे रक्ताने माखलेले बूट पीडिताच्या घराजवळील एका नाल्यात आढळून आले होते. या प्रकरणात हा महत्त्वाचा पुरावा ठरला होता. गुन्हा केल्यानंतर मोहंमद पेरम्बवूर येथून फरार झाला होता. ५० दिवसांनंतर पोलिसांनी त्यास कांचीपुरममध्ये अटक केली होती.

 

१५०० लोकांची चौकशी
या प्रकरणाच्या तपासात विशेष तपास पथक व पोलिसांच्या १०० हून अधिक अधिकाऱ्यांनी १ हजार ५०० हून अधिक लोकांची चौकशी केली होती. ५ हजार लोकांचे बोटांचे ठसे नोंदवले होते. प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान १०० हून अधिक जणांची साक्ष नोंदवण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...