आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'युवा हुंकार रॅली'ला पोलिसांनी परवानगी नाकारली, जिग्नेश मेवाणी मात्र रॅली करण्यावर ठाम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - गुजरातमधील दलित नेते आणि आमदार जिग्नेश मेवाणी यांनी मंगळवारी संसद मार्ग ते पंतप्रधान निवासापर्यंत 'युवा हुंकार रॅली' काढण्याची घोषणा केली होती. पण पोलिसांनी 26 जानेवारीच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर रॅलीला सुरक्षा नाकारली आहे. संसद मार्गावर पोलिसांनी मोठ्या संख्येने फौजफाटा तैनात केला आहे. 


नवी दिल्लीच्या डीसीपींनी ट्वीटद्वारे माहिती दिली की, पोलिसांकडून रॅलीच्या आयोजकांना दुसऱ्या जागी जाण्याचा सल्ला दिला जात आहे. पण ते काहीही ऐकायला तयार नाहीत. या रॅलीमध्ये जिग्नेश मेवाणी यांच्याबरोबरच माहिती अधिकार कार्यकर्ते अखिल गोगोईदेखिल सहभागी होणार आहे. रॅलीशी संलग्न कार्यकर्त्यांच्या माहितीनुसार 2 जानेवारीला घोषणा झाल्यापासूनच ही रॅली रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या रॅलीची घोषणा करताना मेवाणी म्हणाले होते की, आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायला जाऊ. आमच्या एका हातात संविधान असेल आणि एका हातात मनुस्मृती मोदींना काय निवडायचे आहे ते आम्ही त्यांना विचारू असे मेवाणी म्हणाले होते. 


ही रॅली सामाजिक न्यायासाठी असल्याचे मेवाणींनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते. दरम्यान, भीमा कोरेगाव येथील हिंसाचार प्रकरणी जिग्नेश मेवाणी आणि उमर खालीद यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली होती. त्यानंतर जिग्नेश मेवाणींनी भाजप आणि आरएसएसवर हल्ला चढवला होता. त्यानंतर या 'युवा हुंकार रॅली'ची योजना आखण्यात आली होती. 


दरम्यान, जिग्नेश मेवाणी यांनी रॅलीपूर्वी ट्वीटकवर भाजपला इशारा दिला आहे. त्यांनी एका पोस्टमध्ये लिहिले, 'बांध ले बिस्तर बीजेपी, राज अब जाने को है, जुल्म काफ़ी कर चुके, पब्लिक बिगड़ जाने को है.. दुसऱ्या एका ट्वीटमध्ये मन की बात वरून चिमटा काढत त्यांनी पोस्ट केले, नफरत फैलाने नही मोहब्बत लुटाने आया हूं, मन की बात नही जनता की बात सुनने आया हूं. एकिकडे मेवाणींनी हा हल्ला चढवला असताना, मेवाणींच्या विरोधात संसग मार्ग परिसरात काही बॅनर झळकले आहेत. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, मेवाणींच्या विरोधातील बॅनर आणि संसग मार्गावरील तैनात फौजफाटा...

बातम्या आणखी आहेत...