आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टूरिस्ट वीजावर भारतात आली नायजीरियन तरूणी अन् करू लागली असे काम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालंधर- येथे 1 किलो हेरॉइनसह पोलिसांनी एका नायजीरियन तरूणीला अटक केली आहे. या महिलेसोबत आणखी दोन लोकांना देखील अटक करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी शहरातील लौहिया येथे पोलिसांनी नाकाबंदी केली होती. यावेळी आरोपींची कार थांबवून पोलिसांनी त्यांची तपासनी केली, तेव्हा त्यांच्याकडे हेरॉइन सापडले.

 

एसएसपी गुरपीत सिंह भुल्लर यांनी सांगितले की, तीन्ही आरोपी एका वारना कारमधून जात होते. सर्वात आधी ड्रायविंग सीटवर बसलेल्या मोहाली येथील 32 वर्षाचा पुनीत झावडाची तपासणी करण्यात आली. पुनीतकडे 5 ग्रॅम हेरॉइन आढळून आले. यानंतर मागील सीटवर बसलेल्या पंजाब येथील कर्मजीत सिंह (22) कडे 200 ग्रॅम तर नायजीरियन तरूणी फेत (25) कडे 800 ग्रॅम हेरॉइन आढळून आले.
 

टूरिस्ट वीजावर भारतात आली तरूणी...
पोलिसांनुसार, आयडीरियन तरीणी फेत डिसेंबर 2017 मध्ये बहिनीसोबत टूरिस्ट वीडावर भारतात आली. येथे तिची ओळख दिल्लीत राहणाऱ्या नायजीरियन तरूण जॉनशी झाली. काही दिवसांपूर्वी जॉन जेलमध्ये गेला आणि तेथूनच तो फेतच्या माध्यमातून हेरॉइनचा धंदा करत होता. तसचे, फेतसोबत पकडण्यात आलेले पुनीत आणि कर्मजीत यापूर्वीदेखील हेरॉइन तस्करी प्रकरणी जेलमध्ये गेलेले आहेत.

 

पुढील  स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज....

बातम्या आणखी आहेत...