आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटकातही निपाहची लागण; केरळात पुन्हा एक दगावला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू/कोझिकोड -जीवघेणा निपाह व्हायरसचे लागण केरळच्या सीमेवरील कर्नाटक राज्यातही झाली आहे. कर्नाटकाच्या मंगळुरूत निपाह विषाणूग्रस्त दोन संशयित रुग्णांवर उपचार सुरू असून, हे दाेन्ही केरळचेच आहेत. त्यापैकी एकाने नुकतीच एका निपाहग्रस्त रुग्णाची भेट घेतली होती. 


दरम्यान, केरळात निपाहमुळे गुरुवारी अाणखी एकाचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील मृतांचा आकडा       १२ वर पोहोचला आहे. कोझिकोड जिल्ह्यात सर्वाधिक लागण झाली आहे. कोझिकोड वैद्यकीय महाविद्यालयात १३६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. १६० रुग्णांचे नमुने चाचण्यांसाठी पाठवले आहेत. २२ जणांचा अहवाल आला असून १४ जणांना निपाहची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विद्यापीठाच्या परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. कोचिंग, ट्यूशन, क्लासेस व सार्वजनिक बैठकांवर बंदी आणण्यात आली आहे. प्रभावित शाळा व अंगणवाड्या बंद ठेवण्याचे आदेशही देण्यात अाले आहेत. 

 

ओडिशातही अॅलर्ट
निपाह व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी ओडिशातही अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यात काही वटवाघळांचा अकस्मात मृत्यू झाला आहे. त्यांचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

 

एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीप्रमाणे, मूसा नामक व्यक्तीचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. यापूर्वी याच महिन्यात त्याच्या दोन मुलांचा आणि एका नातेवाइकाचा मृत्यू झाला. त्याच नातेवाइकाचा मृत्यू राज्यात व्हायरसने झालेला पहिला मृत्यू होता. 


31 मे पर्यंत कोचिंग-ट्रेनिंग बंद
- कोझिकोडेचे जिल्हाधिकारी यूव्ही जोशी यांनी 31 मे पर्यंत सर्वच सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी लागू केली आहे. एवढेच नव्हे, तर कोचिंग आणि ट्रेनिंग सेंटर सुद्धा सुद्धा बंद करण्यात आले आहेत. 
- आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीप्रमाणे, आतापर्यंत 160 संशयित रुग्णांच्या रक्ताचे नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले. त्यापैकी 22 जणांचा निकाल समोर आले असून 14 नवीन रुग्ण सापडले आहेत. 
- कोझिकोडे मेडिकल कॉलेजमध्ये 160 आणि मल्लप्पुरम येथे 24 जणांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.


केरळसह 4 राज्यांमध्ये अॅलर्ट
- केरळसह इतर 4 राज्यांमध्ये निपाह संदर्भात सतर्कता बाळगण्यासाठी अॅलर्ट जारी करण्यात आले आहेत. यात जम्मू-काश्मीर, गोवा, राजस्थान आणि तेलंगणा राज्यांचा समावेश आहे. 
- केरळ सरकारने कोझिकोडे, मल्लप्पुरम, वायनाड आणि कुन्नूर जिल्ह्यांमध्ये जाऊ नये असा इशारा दिला आहे. या चार जिल्ह्यांमध्येच सर्वाधिक रुग्ण आणि सर्वात जास्त संक्रमण आहे. दुसरीकडे गोव्यात संशयित रुग्णांवर नजर ठेवण्यासाठी एक विशेष टीम तयार करण्यात आली आहे. 

 

हेही वाचा...

divyamarathi.com विशेष : वाचा काय सांगताहेत निपाहचा शोध लावणारे शास्त्रज्ञ

बातम्या आणखी आहेत...