आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारायपूर (छत्तासगड)- शहरातील क्रिकेट सट्ट्याचे रॅकेट चावणारा मोहम्मद आसिफ केवळ दोन वर्षात सट्टा किंग बनला. पोलिसांनी केलेल्या छापेमारीत 50 कोटींच्या कलेक्शनसह 2.65 कोटी रुपये कॅश सापडले आहेत. यात आरिफने 65 लाख अलमारीत लपवले होते, तर दोन कोटी रूपये त्याने बेडमध्ये लपवले होते. ज्या बेडमध्ये पैसे लपवले होते, तो त्याच बेडवरवर झोपत होता. बेडखाली पैसे लपवण्यासाठी त्याने दीवानसारखे डिझाइन बनवून घेतले होते. छापेमारी दरम्यान जेव्हा पोलिस पैशांचा तापस करत होते, तेव्हा त्याने पोलिसांना चुकांडा देण्याचा प्रयत्न केला.
पैसे मोजता-मोजता मशीन झाली खराब...
पोलिसांना जप्त नोटा मोजण्यासाठी लागले चार तास, पोलिसांनुसार, बँकातून नोट मोजण्याच्या पाच मशीन मागवण्यात आल्या होत्या. यातील एक मशीन नोटा मोजता-मोजता खराबा झाली. नोटा मोटण्यासाठी आधी बंडल बनवण्यात आले, नंतर मशीनने मोजण्यास सुरूवात केली. पोलिसांना देखील कल्पाना नव्हती की एवढी मोठी रक्कम हाती लागेल.
साधारण दिसणाऱ्या दोन मजली घरात एवढी मोठी रक्कम...
आरोपीचे बाहेरून साधारण दिसणाऱ्या दोन मजली घरातील अलमारीत आणि बेडमध्ये कोट्यावधींची रक्कम लपवण्यात आली होती. छाप्यात अटक करण्यात आलेल्या आसिफचे घर कॅश जमा करण्याचे सेंटर बनले होते, येथेच एजंट सट्ट्यांच्या पैशांचे कलेक्शन जमा करत होते. आसिफचा दुसरीकडे एक आलिशान फ्लॅट आहे. त्याची संपत्ती देखील तपासण्यात येत आहे.
पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्....
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.