आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता 200 मीटर अंतरावरूनही होऊ लागते भगवान केदारनाथांचे दर्शन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केदारनाथ - ५ वर्षांपूर्वी म्हणजे १६ जून २०१३ रोजी विनाशकारी प्रलय आला होता आणि सर्व काही उद्ध्वस्त झाले होते, याचा अंदाज  केदारनाथांच्या दर्शनासाठी प्रथमच आलेल्या भाविकांना येणे अवघड आहे. परंतु आता केदारनाथ त्या दुर्घटनेतून सावरला आहे. भाविकांत उत्साह दिसून येतो आहे. सर्व चित्र पालटलेले आहे. कोणाच्याही मनात भीतीचा लवलेशही नाही. मंदाकिनी व सरस्वती नदीच्या संगमानंतर वर जाताच २०० मीटर अंतरावरून केदारनाथ मंदिर दिसू लागते. आधी ४०- ५० मीटर अंतरावरून मंदिर दिसत असे. केदारनाथ हेलिपॅडवर दर तासाला २५ ते ३० हेलिकॉप्टरचे लँडिंग व टेक-ऑफ झालेले असते. मंदिरापासून एक किमी परिसरात राहण्यासाठी सुमारे ७ हजार बेड उपलब्ध आहेत.     


पुरोहित पुनर्वसनावर नाराज

केदारनाथ येथे  पुनर्वसनाचे कामसुरू असताना पुरोहितांची घरे व दुकाने हटवण्यात आली. केदारसभेचे अध्यक्ष पंडित विनोदकुमार शुक्ला म्हणाले,  मोदी सरकार केदारनाथ धामचा एक तीर्थस्थळाप्रमाणे नव्हे, तर पर्यटनस्थळासारखा विकास करत आहे. पुरोहितांचा रोजगार हिसकावून घेतला जात आहे. त्यांना बेघर केले जात आहे. तर  जिल्हाधिकारी मंगेश घिल्डियाल यांनी सांगितले, प्रत्येक पुरोहिताकडून त्यांच्याच संमतीने करारपत्र भरून घेतले. त्यांना जमिनीच्या मोबदल्यात मावेजा देण्यात आला. आतापर्यंत ४० पुरोहितांना घरे देण्यात आली आहेत.  ७३ पुरोहितांच्या घरांचे बांधकाम सुरू आहे.     १ लाख ८७ हजार भाविक घोडे अथवा पालखीतून, ५० हजार भाविक हेलिकॉप्टरने व साडेतीन लाख भाविक पायी केदारनाथला आले आहेत.     

 

केदारनाथमध्ये सर्वाधिक भाविक     
केदारनाथाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी या वर्षी उच्चांक गाठला आहे. १५ जूनपर्यंत ५,९५,८३२ भाविक दाखल झाले आहेत. कपाट उघडल्याच्या ४२ व्या दिवशी म्हणजे ९ जून २०१८ रोजी ५,७३,७७० भाविक दाखल झालेले हाेते. याआधी म्हणजे २०१२ मध्ये कपाट उघडल्यापासून दीपावलीला कपाट बंद होईपर्यंत (१७५ दिवसांत) ५,७३,०४० भाविक दाखल झालेले होते.     

 

बातम्या आणखी आहेत...