आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिचारिकांना 10 रोगांचा धोका; वेतन 15 हजार; निपाह व्हायरसमुळे परिचारिकेचा मृत्यू चर्चेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर - देशात परिचारिकांची (नर्स) स्थिती खूप खराब आहे. त्यांना दरमहा सरासरी २० हजार रुपये वेतनही मिळत नाही. त्या अनेक प्रकारच्या आजारांत राहून आपल्या रुग्णांची सेवा करत आहेत. गेल्या आठवड्यात केरळमध्ये निपाह व्हायरसच्या रुग्णांवर उपचार करताना लिनी पुतुसेरी या नर्सचा मृत्यू हे त्याचे उदाहरण. अखिल भारतीय   शासकीय परिचारिका संघटनेच्या सरचिटणीस जी. के. खुराणा यांच्या म्हणण्यानुसार, खासगी रुग्णालयांत परिचारिकांची स्थिती वाईट आहे. येथे  त्यांना दरमहा १० ते १५ हजार रुपये दिले जातात.

 

लहान शहरांत तर त्याच्यापेक्षाही वाईट स्थिती आहे. त्यामुळेच परिचारिका खासगी रुग्णालयांत दोन ते तीन वर्षांचा अनुभव घेऊन शासकीय रुग्णालये अथवा मोठ्या कॉर्पोरेट रुग्णालयांत जातात.

 

सरकारी रुग्णालयांत सुरुवातीला परिचारिकेला सुमारे ४५ हजार तर निवृत्तीच्या वेळेस वेतन सुमारे ९० हजार होते. दुसरीकडे नर्सिंग फेडरेशन सुमारे १५ वर्षांपासून सरकारी रुग्णालयांत तैनात नर्ससाठी रिस्क अलाउन्सची मागणी करत आहे, पण आतापर्यंत सरकारतर्फे कुठलेही उत्तर मिळालेले नाही. एकीकडे देशात परिचारिकांना बी.एस्सी. नर्सिंगनंतर विशेष अभ्यासक्रम करून काही औषधी लिहून देण्याचा अधिकार देण्याबाबत काम सुरू आहे.

 

दुसरीकडे सध्या देशभरात परिचारिकांद्वारे केले जात असलेले काम पुरेसे नाही, असे सांगितले जात आहे. त्यामुळेच परिचारिकांना अजूनही सातव्या वेतन आयोगाचा फायदा मिळाला नाही आणि रिस्क अलाउन्सही मिळाला नाही.

 

दिल्ली परिचारिका संघटनेच्या सरचिटणीस एल. डी. रामचंदानी म्हणाल्या की, देशात एक हजार लोकसंख्येच्या मागे १.७ परिचारिका आहेत, तर जागतिक सरासरी प्रति हजार २.५ परिचारिका अशी आहे. आपल्या मागण्यांसाठी परिचारिका देशभर आंदोलन करत आहेत, पण राज्य आणि केंद्र सरकार यांच्यापैकी कोणीही त्याकडे लक्ष देत नाहीत.

 

अहवाल थंड बस्त्यात
सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार देशात नर्सचे वेतन आणि सुविधांच्या समीक्षेसाठी एक समिती बनवली होती. समितीने अहवालात म्हटले होते की, देशभरात २०० किंवा त्यापेक्षा जास्त बेडच्या रुग्णालयांत काम करणाऱ्या नर्सना त्या राज्याच्या सरकारी रुग्णालयांत काम करणाऱ्या नर्सएवढे वेतन मिळावे, पण त्यावर अद्याप कुठलाही निर्णय झाला नाही.

 

गंभीर आजाराचा धोका
नर्सेसना स्वाइन फ्लू, ट्युबरक्लोसिस, इबोला, निपाह, झिका व्हायरस, हेपटायटिस ए आणि बी, एचआयव्ही पॉझिटिव्ह, हूपिंग कफ, रेबीज यांसारख्या संक्रामक आजारांचा धोका असतो. अ. भा. शासकीय परिचारिका संघटनेचे म्हणणे आहे की, या आजारांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरला रिस्क अलाउन्स मिळतो, पण सेवा करणाऱ्या परिचारिकांना मिळत नाही.

 

बातम्या आणखी आहेत...