आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईशान्येतील चार राज्यांत पुराने नुकसान; 7 नद्यांना पूर, 24 जणांचा मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुवाहाटी/इम्फाळ/आगरतळा - ईशान्येकडील आसाम, मणिपूर, त्रिपुरा आणि मिझोराम या चार राज्यांत पुराने मोठे नुकसान झाले आहे. या राज्यांतील सात नद्यांना पूर आला आहे. ३५ हजार जणांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे. पुराने २४ जणांचा मृत्यू झाला आहे. लष्कर, हवाई दल आणि एनडीआरएफ बचाव कार्यात व्यग्र आहेत. सर्वाधिक प्रभावित राज्यांत आसाम, मणिपूरचा समावेश आहे. आसाममध्ये सर्वाधिक १२ मृत्यू झाले आहेत.  

 

आसाम : ४ हजार हेक्टर पिकांना फटका  
आसामच्या ६ जिल्ह्यांतील ६६८ गावे पुराच्या विळख्यात आहेत. ४ हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. ब्रह्मपुत्रा नदीची पाणीपातळी ४-५ सेंमी प्रतितास वेगाने वाढत आहे. हीच स्थिती राहिली तर दोन दिवसांत नदीची पाणी पातळी धोक्याच्या पातळीवर पोहोचेल.  

 

त्रिपुरा : त्रिपुराच्या अनेक गावांतून ९५० लोकांना वायुदलाच्या जवानांनी वाचवले. २००० पेक्षा जास्त लोक मदत छावण्यांत आहेत. वायुदल रसद पुरवठा करत आहे. 

 

मणिपूर: मणिपूरच्या थॉबल, इम्फाळ पश्चिममध्ये मोठा पूर आहे. इम्फाळच्या इरोंग, उछिवा, मइबम, अराप्ती आणि मोंगजम गावांतून ४३० लोकांना वाचवण्यात आले आहे.

 

केरळ : पावसामुळे भूस्खलन होऊन ५५ जणांचा मृत्यू झाला आहे. बचाव कार्यातील पथकांनी ढिगाऱ्यांखाली अनेक मृतदेह दबले असल्याची शंका व्यक्त केली आहे.  

 

बातम्या आणखी आहेत...